आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक महिलेशी ट्विटरवर भिडले ऋषी कपूर, म्हणाले पाकिस्तानला केवळ तिरस्कारच हवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋषी कपूर ट्विटरवर उघडपणे कॉमेंट्स करण्यासाठी ओळखले जातात. (फाइल) - Divya Marathi
ऋषी कपूर ट्विटरवर उघडपणे कॉमेंट्स करण्यासाठी ओळखले जातात. (फाइल)
नवी दिल्ली - ट्विटरवर बेधडक आणि काहीशा वादग्रस्त पोस्ट आणि कॉमेंट्स करण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूडचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यावेळी एका पाकिस्तानी महिलेशी भिडले. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक ट्विट केले होते, त्यावर पाकिस्तानी नागरिकांचे कॉमेंट येत असतानाच एका महिलेने चक्क शिवीगाळ केली. यानंतर चिंटूजी आणि संबंधित महिलेमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.
 
पाकिस्तानात भारतीय नौदल अधिकारी (माजी) कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर ट्वीट करत ऋषी कपूर म्हणाले की "भारताला दुःख आहे की अभिनेते, चित्रपट आणि स्पोर्ट्स दोन्ही देशांमध्ये शांततेचा प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला. पाकिस्तानला केवळ तिरस्कार हवा." 
पाकिस्तानला तणाव आवडत असेल तर ठीक आहे. कारण, टाळी एका हाताने वाजत नाही असेही चिंटूजी म्हणाले.
 
- पाकिस्तानकडून यावर अनेक कॉमेंट्स करण्यात आले. यात एका महिलेने तर चक्क शिवीगाळ केली... 
- त्यावर ऋषी कपूर भडकले. "आपल्या भाषेवर लक्ष्य दे यंग लेडी... तुमच्या आई-वडिलांनी नक्कीच तुम्हाला असे बोलालयला शिकविले नसेल."
 
बेधडक ट्वीटसाठी प्रसिद्ध 
- काही दिवसांपूर्वीच करीना कपूर हिने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवण्यावरून ट्वीटरवर अनेक गलिच्छ कॉमेंट्स करण्यात आले त्यावर सुद्धा ऋषी कपूर संतप्त झाले होते.
- ऋषी कपूर यांनी लिहिले "पालक आपल्या मुलांचे नाव काहीही ठेवतील त्यावर तुम्हाला का त्रास होतोय? त्याच्या नावाने तुमचे काहीच देणे-घेणे नाही, त्याचे नाव त्याच्या आई-वडिलांची इच्छा आहे.
- यानंतरही एका ट्वीटर यूझरने लिहिले, "सर्वच नावांमधून तैमूर. पालक एवढा विचित्र नाव कसे काय ठेऊ शकतात. 
- त्यावर ऋषी कपूर आणखी भडकले. त्यांनी उत्तर दिले, की "तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. तुमच्या मुलाचे नाव नाही ना ठेवले. मग, कॉमेंट करणारे तुम्ही कोण?"
 
पुढील स्लाईडवर वाचा - ऋषी कपूर आणि पाकिस्तानी महिलेत असा झाला वाद...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...