आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actrace Cate Blanchett Become Talk On Fugitive Syrians

अभिनेत्री ब्लँचेट सिरियातील निर्वासितांवर बोलणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ऑस्कर विजेती अभिनेत्री केट ब्लँचेट शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या जागतिक परिषदेत सहभागी होणार असून सिरियातील निर्वासितांची समस्या या विषयावर ती आपले विचार मांडणार आहे.
वुमेन इन द वर्ल्डच्या व्यासपीठावर प्रसिद्ध पत्रकार टिना ब्राऊन, दिग्दर्शिका दीपा मेहता, शबाना आझमी, माधुरी दीक्षित, नंदिता दास, नैना लाल किडवई, आेबेगेली इझिकवेसिली, समंथा पॉवर या वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज महिला संवाद साधणार आहेत. सहभागी होणाऱ्या महिलांना आपल्या मनातील काही मुद्दे, प्रश्न यावर संवाद साधण्याची इच्छा आहे. ब्लँचेटदेखील त्यासाठी भारतात येणार असून सिरियातील गंभीर समस्येला तिला सर्वांसमोर मांडायचे आहे. व्हॅनिटी फेअरच्या संपादक ब्राऊन यांना अभिनेता आमिर खानने या परिषदेचे निमंत्रण दिले होते. विविध क्षेत्रातील दिग्गज किंवा सेलिब्रिटी असलेल्या या महिलांना काही मुद्द्यांवर आपले म्हणणे मांडण्याची इच्छा असते. परंतु त्यासाठी योग्य ते व्यासपीठ मात्र मिळत नाही. विशेष करून मानवी हक्काच्या मुद्द्यावर अशा महिलांना बोलण्याची संधी या माध्यमातून पहिल्यांदाच मिळणार आहे.