आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने अर्जनसिंगांना म्हटले Romantic, दोघांमध्ये होते हे कनेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री मंदिरा बेदी रविवारी मार्शल अर्जनसिंगांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीला आली होती. - Divya Marathi
अभिनेत्री मंदिरा बेदी रविवारी मार्शल अर्जनसिंगांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीला आली होती.
नवी दिल्ली - 'शांती' मालिकेतून घराघरात परिचयाची असलेली अॅक्ट्रेस मंदिरा बेदी मार्शल अर्जनसिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी दिल्लीला आली होती. मंदिराने अर्जनसिंग यांचा वेगळाच पैलू यावेळी सर्वांसमोर मांडला. मार्शल अर्जनसिंग हे रोमँटिक स्वभावाचे असल्याचे मंदिराने सांगितले. मार्शल अर्जनसिंग हे नात्याने मंदिराचे मावसा होते. मंदिराने सांगितले की असा एकही दिवस जात नव्हता ज्या दिवशी मावसा, मावशीला आय लव्ह यू म्हणत नव्हते. 

मंदिराचे असायचे नेहमी येणे-जाणे
- भारतीय वायू सेनेचे एकमेव मार्शल अर्जनसिंग यांचे शनिवारी (16 सप्टेंबर) रात्री निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. 
- एका इंग्रजी दैनिकासोबत बोलताना मंदिराने सांगितले की मी एक-दोन दिवसांसाठी दिल्लीत आले की मावसाला भेटल्या शिवाय जात नव्हते. 
- मंदिराच्या म्हणण्यानुसार, 98व्या वर्षीही मार्शल अर्जनसिंग हे अतिशय सक्रिय होते.
- कोणीही त्यांना भेटायला आल्यानंतर मोठ्या उत्साहात ते त्यांचे स्वागत करायचे. आणि विशेष म्हणजे निरोपावेळी दारापर्यंत सोडायला यायचे. 

यासाठी जायची मंदिरा मावशीच्या घरी... 
 - अर्जनसिंग हे माझे मावसा आहेत, माझे नातेवाईक आहेत हे सांगताना एक अभिमान वाटतो, असे मंदिरा म्हणाली. 
 - मार्शल अर्जनसिंगाच्या आठवणींना उजाळा देताना मंदिराने सांगितले, की तिला स्टॅम्प गोळा करण्याची आवड होती. ती जेव्हा दिल्लीत असेल तेव्हा मावसाची भेट घेण्यासाठी यायची आणि थेट त्यांच्या स्टडी रुममध्ये जायची. 
 - स्टडी रुममध्ये मावसाचे डस्टबीन चेक करणे हे माझे पहिले काम होते. त्यांना जगभरातून पत्र येत होते आणि रिकामे पाकिट ते डस्टबिनमध्ये टाकायचे. त्यातून मला विविध देशांचे स्टॅम्प मिळत होते. 
 - मंदिराने सांगितले, जेव्हा मावसा मला राष्ट्रपती भवन दाखवण्यासाठी घेऊन गेले, तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि सुंदर दिवस होता. 
 - मार्शल अर्जनसिंग आणि मंदिरा यांच्यातील खास गोष्ट म्हणजे दोघांचाही जन्मदिन 15 एप्रिलला आहे. या दिवशी दोघेही एकमेकांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अर्जनसिंग आणि मंदिराचे निवडक फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...