आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदर्श घोटाळा : कोर्टाने केंद्राकडून मत मागवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आदर्श सोसायटी घोटाळ्यात आपण सक्रिय नव्हतो, यासंबंधीची याचिका महाराष्ट्रातील माजी अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आरोपपत्रातून आपले नाव वगळण्याची मागणी यात केली आहे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मत मागवले आहे. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आणि ए. एम. सप्रे यांच्या पीठाने माजी उपसचिव (शहर विकास) पी. व्ही. देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्राकडून मत मागवले आहे.

सनदी अधिकारी देशमुख यांनी आपण या प्रकरणातील पार्टी नसून सध्या सुरू असलेल्या सुनावणीतून आपल्याला वगळण्यात यावे, असे याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात आदर्श घोटाळ्याच्या सुनावणीदरम्यान आपल्या अनुपस्थितीत नाहक आपल्या नावाचा उल्लेख करण्यात येत आहे. शिवाय आक्षेपार्ह टिप्पणीही केली जात असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेविषयी केंद्राने ४ आठवड्यांत मत द्यावे, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, ३१ मजली आदर्श अपार्टमेंट पाडण्यावर २२ जुलै रोजीच्या सुनावणीत न्यायालयाने स्थगिती आणली होती.
बातम्या आणखी आहेत...