आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adhar Card Not Complusary, Supreme Court Order As It

आधार कार्ड सक्तीचे नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आधार कार्ड सक्तीचे नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. यामुळे कोणत्याही सरकारी सेवेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड सक्तीचे नसेल. यामुळे एलपीजी गॅस सबसिडीशी आधार कार्ड जोडण्याची योजना लटकली आहे. दुसरीकडे, अंतिम निकाल लागेपर्यंत लोकांना विनासबसिडीचे सिलिंडर खरेदी करणे भाग पडू शकते, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.


या संभ्रमामुळे कोर्टाने आदेशात बदल करावा, अशी विनंती सरकार व तेल कंपन्यांनी केली होती. बाजू मांडण्यासाठी सरकारने नामांकित वकिलांची टीम कोर्टात उतरवली होती. अ‍ॅटर्नी जनरल जी.ई. वहानवटी, सॉलिसिटर जनरल मोहन पाराशरन, अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव यांनी कोर्टाला राजी करण्याचा हरेक प्रयत्न केला. मात्र, निकाल बदलण्यास कोर्टाने नकार दिला.


‘आधार’ला घटनात्मक दर्जा, कॅबिनेटची मंजुरी
‘आधार’ला कायदेशीर दर्जा देण्यासाठीच्या यूआयडीएआय विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ते राज्यसभेत मांडले जाईल. तेथे मंजुरीनंतर यूआयडीएआयला वैधानिक संस्थेचा दर्जा मिळेल. तूर्तास हा फक्त सरकारी आदेश आहे. त्याच्या मसुद्यानुसार यूआयडीएआय ‘आधार’ची निगराणी करेल.