आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंप असो वा दुकान, बोटाचा ठसा वापरून करा पेमेंट; आधार-पे सुविधा शुक्रवारपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आता कोणतेही पेमेंट करण्यासाठी आपल्याला रोकड, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. आधार-पेच्या माध्यमातून केवळ बोटाचा वापर करून सहजपणे पेमेंट करता येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे याचा शुभारंभ होणार आहे.

सध्या दिल्लीतील काही ठिकाणी याची चाचणी सुरू होती. पेट्रोल पंप, रिटेल मार्केट आणि घाऊक दुकानांतही ही सुविधा पुरवली जाणार आहे. सहा ते नऊ महिन्यांत ७० टक्के दुकानांत आधार-पे सुविधा सुरू करण्याचे केंद्र सरकारने लक्ष्य ठेवले आहे. बोटाचा ठसा घेतल्याशिवाय पेमेंटच होणार नसल्याने यात फसवणूक होऊ शकणार नाही, असा केंद्र सरकारचा दावा आहे. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... आधार-पेच्या वापरावर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) लावला जाईल
बातम्या आणखी आहेत...