आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यमशीलतेत आयआयटीपेक्षा आयआयएम मागे का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयआयटीचे विद्यार्थी उद्यमशीलतेत आयआयएमपेक्षा अग्रेसर ठरत आहेत. आयआयएम व्यावसायिक कौशल्य शिकण्यासाठी ओळखले जाते. देशातील अव्वल आयआयएम संस्थांमध्ये आयआयटीच्या तुलनेत निम्मापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी आंत्रप्रेन्योरशिप निवडली आहे. या वर्षी देशाच्या १६ आयआयटी संस्थांमधील जवळपास १६०० विद्यार्थी प्लेसमेंटच्या प्रक्रियेपासून बाहेर राहले. आयआयटीमध्ये गेल्या वर्षीपर्यंत जवळपास ९८०० जागा होत्या. म्हणजे १६ टक्क्यांहून जास्त विद्यार्थ्यांचा कल आंत्रप्रेन्याेरशिपकडे होता. दुसरीकडे आयआयएम संस्थांमध्ये जवळपास ३५०० जागा आहेत. यामध्ये २०० विद्यार्थीही (६ टक्के) उद्यमशीलतेची वाट धरली आहे.
थॉमसन रायटर्सच्या नव्या अहवालानुसार, देशात फंडेड स्टार्टअप सुरू करणाऱ्यांमध्ये ४७ टक्के आयअायटी किंवा आयआयएम संस्थांमधीलच विद्यार्थी आहेत. मात्र, त्यात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. २०१४ च्या एका अहवालानुसार, देशात सुरू होणाऱ्या स्टार्टअपमध्ये ५० टक्के एकट्या आयआयटी विद्यार्थ्यांच्या होत्या. अभ्यासक्रमाचे स्वरूप हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अायआयएम, अहमदाबादच्या आंत्रप्रेन्याेरशिप क्लबचे सदस्य चिन्मय गावडे म्हणाले, विद्यार्थी कोर्स पूर्ण केल्यानंतर चांगल्या पॅकेजच्या नोकरीला प्राधान्य देतात. अायआयटीतून बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय २२ सरासरी वर्षे असते. त्यामुळे सर्जनशील उत्पादनाला व्यावसायिक स्वरूप देणे सोपे ठरते. कोर्स शुल्कही एक कारण आहे. मात्र, तज्ज्ञांचे त्यावर एकमत नाही. आयआयटी संस्थांबाहेरचे शिक्षण
यामागचे मुख्य कारण असल्याचे आयआयटी कानपूरचे प्रो. एच.सी. वर्मा यांचे म्हणणे आहे.

तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप जास्त फायदेशीर
टेकप्रेन्योरशिपचा ट्रेंड
1. जुलै, २०१५ मध्ये १ अब्ज डॉलर(सुमारे ६२ अब्ज रुपये) पेक्षा जास्त मूल्याच्या सात स्टार्टअपना युनिकॉर्न क्लबमध्ये स्थान मिळाले आहे. यामध्ये पाच आयआयटी विद्यार्थी होते. वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थाही ब्रँड अायआयटीसोबत जोडण्यास सहज तयार होतात. आयआयटी, रुरकीच्या अकॅडमिक्स विभागाचे डीन संदीप सिंह म्हणाले, तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व हे त्यामागचे कारण आहे. टेकप्रेन्योर संशोधनाच्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या कल्पनांना चालना देतात. त्यामुळे ते जास्त यशस्वी हाेतात.

शुल्कातील अंतर
2. आयआयएमच्या पीजीपी कोर्सचे शुल्क ९ लाख ते १७ लाख रुपयांदरम्यान आहे. आयआयटीच्या बीटेक कोर्सचे सध्याचे शुल्क ९० हजार रुपये वार्षिक(चार वर्षांचे ३ लाख ६० हजार रुपये) आहे. रांचीच्या आयआयएमचे प्रभारी संचालक ए.सेन म्हणाले, आयआयटी विद्यार्थ्यांना आयआयएम विद्यार्थ्यंाच्या तुलनेत कमी खर्च येतो. हे विद्यार्थी जोखीम स्वीकारण्यास जास्त तयार असतात. सेन जास्तीचे शुल्क यामागचे कारण मानत नाहीत.
अभ्यासक्रमातील फरक
3. आयआयएम विद्यार्थ्यांना जोखीम स्वीकारण्याच्या मानसिकतेचे प्रशिक्षण दिले जाते. केवळ व्यवसायाची सुरुवातच नव्हे तर त्यांना व्यवसाय करण्याचे शिक्षण दिले जाते. आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी आंत्रप्रेन्याोरशिपचा निर्णय घेणे सोपे ठरते. उत्पादन आणि डिझायनिंगची माहिती त्यांना आधीपासूनच असते हे त्याचे कारण आहे. अहमदाबादच्या आयआयएममधील एक प्रोफेसर म्हणाले, आमचे विद्यार्थी व्यवसाय सुरू करू इच्छितात. मात्र, चार-पाच वर्षांच्या कामाच्या अनुभवाची ते वाट पाहतात.
दोन्ही ठिकाणी इनक्युबेशन सेंटर आणि विलंबाने नोकरी
आयआयटी
बहुतांश आयआयटीमध्ये आंत्रप्रेन्योरशिपसाठी इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथील विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रत्येक सुविधा अस्तित्वात आहे. फॅकल्टी आणि उद्योग तज्ज्ञ कल्पकतेचा आढावा घेऊन निधी, व्यवसाय मॉडेल, मार्केटिंग, नेटवर्किंग यासारख्या पैलूंवर विद्यार्थ्यांना सल्ला देतात. मद्रास, मुंबई आणि गुवाहाटीसारख्या आयआयटी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना विलंबाच्या नोकरीची सुविधा आहे. यात विद्यार्थी पदवी पूर्ण केल्यानंतर वर्षभरात प्लेसमेंटच्या प्रक्रियेत सहभागी होतात. यादरम्यान ते आंत्रप्रेन्याेरशिपचा पर्याय निवडू शकतात.

आयआयएम
अनेक आयआयएम संस्थांमध्ये इनक्युबेशन संेटर असून तिथे विलंबाच्या नोकरीची सुविधा आधीपासूनच आहे. आयआयएम, कलकत्त्यामध्ये विलंबाने नोकरीची सुरुवात १९११ मध्ये झाली होती. आयआयएम,अहमदाबादमध्ये एका विद्यार्थ्यांने सांगितले, संस्थेत प्रवेशाचे सर्वात मोठे आकर्षण प्लेसमेंट आणि पॅकेज स्ट्रक्चरचे आहे. चांगल्या पॅकेजची नोकरी निवडण्यास त्यांना आवडते. आंत्रप्रेन्योरशिपसाठी अनुकूल वातावरणाच्या दृष्टीने ते आयआयएमला कमी लेखत नाहीत. मात्र, ए. सेन यांच्या म्हणण्यानुसार, दोन-तीन वर्षांत उद्यमशिलतेचे वातावरण बनवण्यात आयआयटी पुढे राहिली आहे.