आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Admission Fees Information Give On Website, UGC Give Order To Universities

प्रवेश शुल्काची माहिती संकेतस्थळावर द्या, युजीसीचे विद्यापीठांना निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क आणि इतर खर्चाची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात यावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना दिले आहेत. विद्यापीठाचे अभ्यासक्रम चालवणा-या संस्थांना तसे निर्देश देऊन त्यासंबंधीची शुल्क व इतर तपशील संकेतस्थळावर दिला आहे किंवा नाही, याची खात्री करावी असेही कुलगुरूंना सूचित करण्यात आले आहे.

प्रत्येक अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क तसेच संस्थेच्या विकासासाठी आकारण्यात येणा-या इतर शुल्काची माहिती संकेतस्थळावर दिली जावी, असे युजीसीने म्हटले आहे. विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या पालकांकडून प्रवेश शुल्क आणि इतर खर्चाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. व्यावसायिक अभ्यासक्रम चालणा-या संस्थांनी शुल्क आकारणीबाबत पारदर्शकता ठेवावी अन्यथा संबंधित संस्थांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी काही संघटनांनी युजीसीकडे केली होती. याची गंभीर दखल घेत युजीसीने कुलगुरुंना उपरोक्त निर्देश दिले आहेत.

गेल्या आठवड्यात मनुष्यबळ विकास मंत्रालयाने महाविद्यालयाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ‘नो युवर कॉलेज’ ही मोहीम राबवली होती. त्याद्वारे एकाच ठिकाणी १०,५०० महाविद्यालयांची इत्यंभूत माहिती देण्यात आली होती. या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून १४ हजार तंत्रविषयक अभ्यासक्रम शिकवले जातात.