आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Admitted Mistakes 27 Years, How To Improve, Salman Rushdi

चूक कबुलीसाठी २७ वर्षे, सुधारण्यास किती, रश्दींचा पलटवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपल्या पुस्तकावर घालण्यात आलेल्या बंदीची कबुली देण्यास २७ वर्षे लागली, परंतु ती स्वीकारण्यास २७ वर्षे लागली, तर सुधारण्यास किती वेळ लागेल, असे प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांनी म्हटले आहे.
२७ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन गृहराज्यमंत्री पी. चिदंबरम यांनी रश्दी यांच्या "द सॅटेनिक वर्सेज' या पुस्तकावर बंदी घातली होती. मात्र, अशाप्रकारची बंदी घालून आपण चूक केली होती, अशी कबुली चिदंबरम यांनी शनिवारी दिली होती. यावर लगेच रश्दी यांनी ट्विटरवरून पलटवार केला आहे. दरम्यान, काँग्रेसमध्येही याबाबत दोन टोकांची मते येऊ लागली आहेत. चिदंबरम १९८६ ते १९८९ या काळात राजीव गांधी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी चिदंबरम यांच्या निर्णयाचे स्वागत केले.