आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advani, MM Joshi Axed From BJP Parliamentary Board

भाजपच्या संसदीय मंडळात लालकृष्ण अडवाणी - मुरली मनोहर जोशींना स्थान नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना स्थान देण्यात आलेले नाही. अटल बिहारी वाजपेयी प्रकृतिच्या कारणामुळे सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यामुळे त्यांची संसदीय मंडळात निवड होणे अपेक्षीतच नव्हते. मात्र, अडवाणी आणि जोशी हे विद्यमान संसदेत खासदार आहेत. वाजपेयी, अडवाणी आणि जोशी यांना पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात जागा देण्यात आली आहे. तर, जे.पी. नड्डा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना संसदीय मंडळात स्थान देण्यात आले आहे.
राग शांत करण्यासाठी मार्गदर्शक मंडळ
सूत्रांच्या माहितीनुसार लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना एकदम बाहेर ठेवले असते तर, पक्षाला त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला असता. त्यामुळे त्यांना मार्गदर्शक मंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मार्गदर्शक मंडळ हे प्रथमच स्थापन करण्यात आले आहे. या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथसिंह यांनाही मार्गदर्शक मंडळात घेण्यात आले आहे. पक्षाने तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याचा प्रत्यय संसदीय मंडळाच्या सदस्य निवडीतही दिसून येत आहे.
संसदीय मंडळाचे सदस्‍य: पक्षाध्यक्ष अमित शाह हे संसदीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्‍वराज, रसायन व खते मंत्री अनंत कुमार, परिवहन आणि महामार्ग मंत्री नित‍िन गडकरी, नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, जे. पी. नड्डा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान.

पुढील स्लाइडमध्ये, विरोधकांनी साधला निशाणा