आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advani On Backfoots, Modi Running In Party Like A Horse

भाजपचे अडवानींना धक्यावर धक्के, दोन प्रचारप्रमुखांची गरज नसल्याचे सुनावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना पक्षाचे धक्यावर धक्के सहन करावे लागत आहेत. अडवानी यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याकडे लोकसभा व विधानसभेसाठी स्वतंत्र प्रचार समित्या बनवण्याची व त्याचे प्रमुखही वेगवेगळे असावेत, अशी मागणी केली होती. मात्र अडवानींची ही मागणी भाजपने साफ फेटाळून लावत दोन-दोन समित्याची व प्रचारप्रमुखांची गरजच काय? असा सवाल केला आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच प्रचार समिती तयार केली जाईल. तसेच त्या समितीचे प्रचारप्रमुखपद नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्यात येईल. पुढील आठवड्यात गोव्यात भाजपच्या होणा-या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जावू शकतो.

येत्या वर्षअखेरीस चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. तसेच पुढील एप्रिल महिन्यात लोकसभेचीही निवडणूक होत आहे. भाजपमध्ये नरेंद्र मोदी हे संभाव्य पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे सांगितले जात आहे. मात्र त्यास अडवानी गटाचा विरोध आहे. त्यातच डिसेंबरमध्ये ज्या राज्यात निवडणूका होत आहेत त्या राज्यात भाजपची सत्ता आहे. तसेच भाजप तेथे पुन्हा विजय मिळवील अशी स्थिती आहे.

मोदी या निवडणूकीसाठी स्टार प्रचारक असणार आहेत. त्याचे श्रेय मोदींना जावू नये असे अडवानींना वाटत आहे. त्यासाठी अडवानींनी लोकसभेचे प्रचारप्रमुखपद मोदींना द्यावे व विधानसभेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करून नितीन गडकरी यांच्यावर ती जबाबदारी सोपवावी, असे म्हटले होते. मात्र नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दात नकार देत मोदींच्या विरोधात जाण्याचे टाळले. आता पक्षानेही अडवानींना स्पष्ट शब्दात दोन वेगवेगळ्या प्रचार समित्याची गरजच नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अडवानी यांचा 1997 च्या काळात काँग्रेसच्या सिताराम केसरी यांची जशी अवस्था झाली होती तशीच अडवानींची अवस्था होते की काय अशी शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. त्यामुळेच अडवानींचा 'केसरी' होणार काय हे येत्या काही दिवसात कळेलच.