आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advani Remains Three Conditions On Parties Stage

किमान सहा महिन्‍यांसाठी अडवानींना हवे होते पंतप्रधानपद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लालकृष्ण अडवानी यांनी पक्षाच्या तीन समित्याच्या प्रमुखपदाचा राजीनामा देण्यापूर्वी पक्षासमोर तीन अटी ठेवल्या होत्या. मात्र पक्षाने त्यांच्या त्या अटी मान्य केल्या नव्हत्या. त्यामुळे अडवानी यांनी मोदींची प्रचारसमितीच्या अध्यक्षपदी निवड जाहीर होण्यापूर्वीच आपला राजीनामा लिहून ठेवला होता. अडवानींनी अखेर सोमवारी दुपारी राजीनाम्याचे पत्र सार्वजनिक केले.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, अडवानी यांनी रविवारी आपल्या राजीनाम्याचे पत्र लिहून ठेवले होते. तसेच आपल्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची महत्त्वाची अट पक्षासमोर ठेवली होती. मात्र, पक्षाने अडवानी यांची मागणी साफ धुडकावून लावली होती. त्यामुळे कमालीचे नाराज झालेल्या अडवानींनी राजीनाम्याचे अस्त्र उगारल्याचे सांगण्यात येते.

अडवानी यांचे म्हणणे होते की, जर एनडीए सत्तेत आली तर आपल्याला किमान सहा महिने तरी पंतप्रधानपद देण्यात यावे. अडवानींना वाटते की, आपण पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे तो आपला हक्क असून पक्षानेही सन्मानाने आपल्याला वागवले पाहिजे.

अडवानी यांनी हे ही म्हटले होते की, जर कोणी पुढे येत असेल तर आपण सहा महिन्यानंतर पीएमपद सोडू. अडवानी यांची अट अशीही होती की, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्याऐवजी त्यांना संयोजक बनवावे.


तिसरी अट अशी होती की, जर मोदी यांना प्रचार समितीचे अध्यक्ष बनविले तर मोदींनी आपल्याला रिपोर्टिंग करावे. सूत्रांच्या माहितीनुसार, अडवानी हे स्वत: निवडणूक रणनिती तयार करु इच्छित होते. तसेच महत्त्वाचे निर्णय माझ्याद्वारेच घेतले जावेत. दरम्यान संघ या बाबींवर हटून बसला की मोदीही निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष असावेत. संघाच्या निर्देशानुसार भाजपने मोदींबाबत निर्णय घेतला व अडवानी पक्षात एकाकी पडत गेले. अखेर याच नैराश्यामुळे अडवानी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

अडवानी यांचा मोदीविरोधातील सूर पाहता पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आपला मुलगा आणि यूपी भाजपचे सरचिटणीस पंकज सिंह यांना दिल्लीत थांबण्यास सांगितले होते. पंकज सतत अडवानींच्या संपर्कात होते. पंकजने अडवानींसाठी चार्टर प्लेन तयार ठेवले होते. जर अडवानी यांचे मन वळविण्यास यश मिळाले असते तर त्यांना प्लेनमध्ये बसवून गोव्यात नेले जाणार होते. मात्र अडवानींनी आपला हट्ट सोडला नाही व गोव्याच्या बैठकीपासून स्वत:ला दूर ठेवले.