आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advani Says: Nehru Had Called Patel A \'total Communalist\'

नेहरुंनी पटेलांना म्हटले होत जातीयवादी: अडवाणी, \'स्वातंत्र्य लढ्यात भाजपचे योगदान नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासंबंधी आणखी एक वाद भाजपकडून उभा केला जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या नव्या ब्लॉगमध्ये एका पुस्तकाचा हवाला देऊन पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सरदार पटेल यांना जातियवादी म्हटले असल्याचा आरोप केला आहे. अडवाणी यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, 'भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलिन करण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री सरदार पटेल यांनी लष्कराला पाचारण करण्याची सुचना केली होती, तेव्हा पंडित नेहरुंनी त्यांना पूर्णपणे जातियवादी व्यक्ति असल्याचे म्हटले होते.'
अडवाणींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये 'द स्टोरी ऑफ एन एरा टोल्ड विदाऊट इल विल' या एम.के.के.नायर यांच्या पुस्तकाच्या हवाल्याने हा आरोप केला आहे. या पुस्तकात हैदराबादच्या पोलिस अॅक्शन कारवाई आधी मंत्रिमंडळ बैठकीत नेहरु आणि पटेल यांच्यामध्ये पराकोटीचा वाद झाल्याचा उल्लेख आहे.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी एका मुलाखतीत भाजपकडे रोल मॉडेल नाही त्यामुळे नरेंद्र मोदी इकडून-तिकडून प्रेरणास्त्रोत शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, नरेंद्र मोदी भाजपच्या एतिहासिक कमतरतेला पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपचा प्रेरणास्त्रोत असलेला एकही नेता स्वातंत्र्य युद्धात सक्रीय सहभागी नव्हता. त्यांच्याकडे आदर्शांची कमतरता असल्यामुळे मोदी प्रेरणा स्त्रोत शोधत आहेत.