आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Advani Settel All Disput Regarding Soliders Murder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जवानांच्या हत्येवरून उठलेले राजकीय वादळ अडवाणींच्या हस्तक्षेपाने दूर झाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पूंछमधील सीमारेषेवर भारताच्या पाच जवानांच्या हत्येवरून उठलेले राजकीय वादळावर गुरुवारी पडदा पडला. त्यावर सरकार आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. परंतु यावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनी मध्यस्ती केली आणि हा वाद मिटला. अँटनी यांच्या खुलाशानंतर भाजपने समाधान व्यक्त करत हा मुद्दा संपुष्टात आल्याचे जाहीर केले.

पाकिस्तान लष्कराचे विशेष दल या हल्ल्यात सहभागी असल्याची कबुली संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी अडवाणी यांच्या आग्रहावरूनच गुरुवारी संसदेत दिला. पाकिस्तानी लष्कराच्या वेशात दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वक्तव्य संरक्षणमंत्र्यांनी आधी संसदेत केले होते. भारतीय लष्कराने या हल्ल्यासाठी पाकिस्तानी लष्कराला जबाबदार ठरवले होते. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून राजकीय वाद सुरू झाले होते. याप्रकरणी विधान बदलल्याचा आरोपही लष्कराने केला होता आणि प्रकरण खूप गंभीर बनले होते. प्रकरण खूप तापल्यानंतर संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांचे हे विधान चुकीचे असल्याचे सांगत त्यात सुधारणा करण्याचा आग्रह अडवाणी यांनी केला होता, असे सूत्रांनी सांगितले. विधानाच्या कूटनीतिक परिणामांवरही अडवाणी यांनी कमलनाथ यांच्याशी चर्चा केली.

आपले म्हणणे अँटनी आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचे विचार कळवावेत, असे अडवाणी यांनी या वेळी कमलनाथ यांना सांगितले. अडवाणी यांनी सांगितलेल्या बाबीवर काँग्रेस नेत्यांमध्ये दीर्घ सल्लामसलत झाली. हल्ल्यात पाकिस्तानी सैनिकांचा समावेश असल्याचे वक्तव्य संरक्षणमंत्री संसदेत देतील, असा निर्णय त्यानंतर घेण्यात आला. गुरुवारी संरक्षणमंत्र्यांनी संसदेत सुधारित खुलासा दिला. भाजपनेही त्यावर समाधान व्यक्त करत हे प्रकरण संपुष्टात आल्याचे जाहीर केले. संरक्षणमंत्र्यांनी आपली चूक मान्य करून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्ही समाधानी आहोत, असे लोकसभा विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितले. संरक्षणमंत्र्यांनी चूक स्वीकारली आणि याबरोबरच हा मुद्दा येथे संपल्याचे भाजप प्रवक्ता शहनवाज हुसैन यांनी सांगितले.