आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advani Unhappy, Remaining BJP Leaders Accept Modi As PM

अडवाणी रुसलेलेच; सुषमा वगळता उर्वरित भाजप नेते मोदींच्या नावावर राजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूक भाजपने जिंकली तर नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार हे सोमवारी निश्चित झाले. लालकृष्ण अडवाणी वगळता उर्वरित सर्व नेते मोदींच्या नावावर राजी झाल्याने आता घोषणा बाकी आहे.
संघाने ही जबाबदारी भाजपवरच सोपवली आहे. त्यानुसार 19 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या पितृपक्षापूर्वीच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. त्यापूर्वी 14 सप्टेंबरला भाजप संसदीय मंडळाची बैठक होऊ शकते. याच दिवशी किंवा 15 तारखेला मोदींच्या नावाची घोषणा होऊ शकते. घोषणेनंतर मोदी मुख्यमंत्रिपदी कायम राहतील; परंतु निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा ते राजीनामा देतील. ही जबाबदारी सुषमा स्वराज व अरुण जेटलींवर सोपवली जाऊ शकते. दुसरीकडे सुषमा स्‍वराज आणि अडवाणी वगळता इतर सर्व नेते मोदींच्‍या पीएमपदाच्‍या उमेदवारीविरोधात आहेत.


सरदार मोदी देशाचे सर्वोच्च नेते : बादल
नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यावरून संघ-भाजपमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू असताना पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी मोदी सध्या देशाचे सर्वोच्च नेते असल्याचे म्हटले आहे. व्हायब्रंट गुजरात कृषि परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी अशी पहिली परिषद आयोजित करणार्‍या मोदींनी आता गुजरातबाहेर पडून कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. बादल यांच्या रूपाने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला उघडपणे सर्मथन देणारा अकाली दल भाजपचा पहिला मित्रपक्ष ठरला आहे. शिवसेनेने अजूनही मोदींच्या नावाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही.


एका ओळीचा प्रस्ताव
‘लोकसभा निवडणूक 2014 साठी नरेंद्र मोदींना एकमताने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले जात आहे..’ असा एका ओळीचा प्रस्ताव भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत मांडला जाईल.


देशाला नवा चेहरा हवा
एका विशिष्ट माणसाकडे नेतृत्व यावे म्हणून देश उत्सुक आहे. भाजपने निर्णय घ्यावा. यातच हित आहे.
मोहन भागवत, सरसंघचालक