आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advertising Standards Of India Banned On Hot And Controversial Ads

आक्षेपार्ह जाहिराती हद्दपार करण्यासाठी मोहीम, एएससीआयची कारवाईची योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जनहिताला बाधा आणणार्‍या जाहिरातींवर तत्काळ कारवाई योजना हाती घेतली जाणार आहे. अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स ऑफ इंडियाने (एएससीआय) अशा जाहिरातींना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे.
अश्लील, असभ्य अशा जाहिरातींना तत्काळ हटवण्याची ही योजना आहे. त्यातून जनहिताला बाधा येऊ शकते. एएससीआयच्या ग्राहक तक्रार मंडळाकडील धूळ खात पडलेल्या तक्रारींचेदेखील लवकरात लवकर निवारण करण्याची योजना त्यात आहे, अशी माहिती एएससीआयचे अध्यक्ष अरविंद शर्मा यांनी सांगितले. आक्षेपार्ह जाहिरातींना हद्दपार करण्यासाठी ही मोहीम असेल. मोहिमेत 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. जाहिरातदार, जाहिरात संस्था आणि माध्यमांनी त्यासाठी योग्य ते सहकार्य केले पाहिजे, असे शर्मा म्हणाले. एएससीआय ही जाहिरात उद्योगामार्फत चालवली जाणारी स्वतंत्र नियामक संस्था आहे.