आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advocate Caught In Mall Filming Women With ‘shoe Camera’: Police

‘शू कॅमऱ्या’ने महिलांचा व्‍हि‍डिओ शूट करणारा वकील अटकेत, मॉलमधील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शहरातील एका प्रसिद्ध शॉपिंग मॉलमध्‍ये शुजमध्‍ये लपवलेल्‍या छुप्‍या कॅमेऱ्याने महिलांच्या हालचालींचे आक्षेपार्ह चित्रण करत असलेल्‍या एका वकिलाला पोलिसांनी अटक केली. न्‍यायायालाने त्‍याला जामीन मंजूर केला. आशीष शर्मा (33) असे त्‍याचे नाव असून, तो कॉरपोरेट लॉयर आहे.

नेमके कसे पकडले ?
शनिवारी सायंकाळी शॉपिंग मॉलमधील क्लॉथ सेंटरमधील व्‍यवस्‍थापकाला एका पुरुषाच्‍या हालचाली संशयास्‍पद वाटल्‍या. हा पुरुष त्‍याच्‍या बाजूला असलेल्‍या महिलेजवळ पाय नेण्‍याचा प्रयत्‍न करत होता. त्‍यामुळे व्‍यवस्‍थापकाने या बाबत सिक्युरिटी गार्ड्सला माहिती दिली. गार्ड्सने या बाबत संबंधित व्‍यक्‍तीकडे विचारणा करणा केली तर त्‍याने पळ काढला. त्‍यानंतर पाठलाग करून त्‍याला पकडले आणि सिक्युरिटी रूममध्‍ये नेऊन त्‍याची चौकशी केली. त्‍यावर त्‍या पुरुषाने आपले नाव सांगितले आणि आपल्‍या शूजमध्‍ये गुप्‍त कॅमेरा असल्‍याची कुबलीही त्‍याने दिली. त्‍याच्‍या माध्‍यमातून महिलांचे व्‍हीडिओ शूट करत असल्‍याचे त्‍याने सांगितले. सिक्युरिटी गार्ड्सने त्‍यांना पोलिसांच्‍या हवाली केले.
पुढील स्‍लाइडवर वाचा कॅमेऱ्यात काय आढळले ?