आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मी ऑफिसर्सने नाकारला \'ऐ दिल\'चा निधी, उद्धव म्हणाले- खंडणीचा पैसा नको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट निर्मात्यांवर बळजबरी करुन आर्मी वेलफेअर फंडसाठी निधी नको असल्याचे माजी आर्मी ऑफिसर्सने म्हटले आहे. - Divya Marathi
चित्रपट निर्मात्यांवर बळजबरी करुन आर्मी वेलफेअर फंडसाठी निधी नको असल्याचे माजी आर्मी ऑफिसर्सने म्हटले आहे.
नवी दिल्ली - 'ऐ दिल है मुश्किल'मधील पाकिस्तानी कलाकारांवरुन उठलेल्या वादळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवलेल्या अटींवर लष्कराने नाराजी व्यक्त केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाक कलाकारांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांना परवानगी देण्यासाठी निर्मात्यांनी आर्मी वेलफेअर फंडात ५ कोटी रुपये जमा करण्याची अट ठेवली होती. आता लष्कर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की लष्कराला राजकारणामध्ये ओढू नका. आम्ही बळजबरीने घेतलेला नाही, तर स्वेच्छेने दिलेला निधीच स्विकारतो.
'खंडणीचा पैसा लष्कराला नको'
'ऐ दिल है मुश्किल'च्या वादावरुन उद्धव ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला. ते म्हणाले, 'खंडणी मागुन मिळविलेला पैसा लष्कराला नको असला पाहिजे. लष्कराला स्वतःचा स्वाभिमान आहे.'
आणखी काय म्हणाले अधिकारी
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्मी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की भारतीय लष्कर हे राजकारण विरहित आणि धर्मनिरपेक्ष आहे. याला फायद्यासाठी राजकारणात ओढू नये.
- माजी नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टिनेंट जनरल बी.एस. जयसवाल म्हणाले, 'आर्मी भीख दिलेला पैसा घेत नाही, जर चित्रपट निर्मात्यांना काही दान देण्याची इच्छा असेल तर त्यांनी इतर भारतीयांप्रमाणे स्वेच्छेने दिले पाहिजे. असे बळजबरी करुन नाही.'
- याशिवाय जयसवाल म्हणाले, 'जर प्रकरण एवढे संवेदनशील असेल तर सरकारने त्यात हस्तक्षेप करुन एक कायमचा तोडगा काढला पाहिजे.'
बातम्या आणखी आहेत...