आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानचे शिष्टमंडळ भारत भेटीवर; ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात भारतीयांना आवतण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अफगाणिस्तानात ऊर्जेचे अनेक स्वच्छ स्त्रोत आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांसाठी देशाची दारे खुली आहेत. भारतीय गुंतवणुकदारांचे आम्ही स्वागत करतो, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

ओसमानी शिष्टमंडळासह भारताच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांत व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उभय देश सहकार्य करू शकतात, अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. फिक्कीच्या वतीने आयोजित परिषदेत आेसमानी गुरूवारी बोलत होते. अफगाणिस्तानात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी मोठा वाव आहे, असे अफगाणिस्तानचे ग्रामीण आणि पुनर्वसन आणि विकास मंत्री नासीर अहमद दुर्राणी यांनी म्हटले आहे. विजेची सुरक्षा हा प्रादेशिक स्थैर्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांनी मिळून या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. अपारंपरिक ऊर्जेवर आधारित उद्योगावर भर दिला गेला पाहिजे. कारण ओद्योगिकीकरणामुळे प्रदूषण आणि निसर्गाची हानी वाढू लागली आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनीही अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला प्राधान्य देण्यासाठी दबाव वाढवलेला दिसतो. म्हणूनच उभय देश या क्षेत्रात एकत्र येऊन काम करू शकतात, असा विश्वास आेसमानी यांनी व्यक्त केला आहे.

६५ टक्क्यांचे उद्दिष्ट
सध्या अफगाणिस्तानात विजेचे निर्मितीचे प्रमाण ३३ टक्के आहे. परंतु आगामी पाच वर्षांत ते ६५ टक्क्यांवर पोहचावे, असे उद्दिष्ट आहे, असे डीएबीएसचे सीईओ अब्दुल राझिक सामादी यांनी सांगितले. देशातील निर्मिती वाढवण्यासाठी अफगाणिस्तानला ऊर्जेसंबंधीच्या गरजांची पूर्तता होणे गरजेचे आहे. देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी अफगाणिस्तान भारताकडे सहकार्याची अपेक्षा ठेवतो, असे ओसमानी यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...