आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 20 Years Appeal May Be Filed Supreme Court

20 वर्षांनंतरही याचिका दाखल करता आली असती - सर्वोच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवृत्त न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्याविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दाखल करून घेतली. याचिकेवर कोणतेही भाष्य न्यायालयाने केले नाही. मात्र, तक्रारदार महिलेने एवढी वाट का पाहिली? 20 वर्षांनंतरही याचिका दाखल केली जाऊ शकते. न्यायमूर्तींचे वय 90 झाल्यानंतरही याचिका दाखल करता आली असती, असा टोला न्यायालयाने लगावला. याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकार आणि न्यायमूर्ती कुमार यांना नोटिसा बजावल्या आहेत.
कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक शोषणाचे खटले चालवण्यासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी यंत्रणा तयार करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीसांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय पीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.
सरन्यायाधीशांचा सवाल
स्वतंत्रकुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने उशिरा तक्रार दाखल केल्याबद्दल सरन्यायाधीश सदाशिवम यांनी प्रश्न उपस्थित केले. तिने एवढे दिवस वाट का पाहिली, असा सवाल करून आणखी 20 वर्षांनी न्यायमूर्तींचे वय 90 झाल्यानंतरही तक्रार करता आली असती, असा टोला त्यांनी लगावला. महिला वकिलातर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे काम पाहत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारींसाठी कालर्मयादा ठरवावी, असे साळवे या वेळी म्हणाले.