आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 6 Months Announcement, No Decision On IIM Chandrakant Khaire

घोषणेला ६ महिने होऊनही आयआयएमचा निर्णय नाही - चंद्रकांत खैरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) स्थापना औरंगाबादेत करण्यात यावी, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी लोकसभेत केली. संस्थेबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते, असेही खैरे म्हणाले. प्रत्येक राज्यात ही संस्था स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली. त्यास सहा महिने उलटले तरीही अजून याबाबत निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रत्येक राज्यात या संस्थेची शाखा देण्याचे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले होते. महाराष्ट्राची संस्था औरंगाबादेत व्हावी, असा मुद्दा खैरे यांनी शून्य प्रहरात उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. त्यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले, असे सांगून या संस्था कधी उभारणार, असा सवालही खैरे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची हरकत नाही
संस्थेसाठी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने (वाल्मी) दोनशे एकर जमीन व मूलभूत सुविधा देण्याची तयारी दर्शविली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली असता त्यांना ही संस्था औरंगाबादेत असण्यावर कोणताही आक्षेप नाही, असेही खैरे म्हणाले.