आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 70 Days Jail Lalu Relax, Supreme Court Give Bail To Fodder Scam

70 दिवसांच्या तुरुंगवासानंतर लालूंना दिलासा, चारा घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 70 दिवसांच्या तुरुंगवासानंतर राजद प्रमुख व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला, परंतु कनिष्ठ न्यायालयात अटी-शर्ती ठरल्यानंतरच लालूंना तुरुंगातून बाहेर पडता येईल.चारा घोटाळाप्रकरणी 66 वर्षीय लालूंना पाच वर्षे तुरुंगवास आणि 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या ते रांची (झारखंड) येथील तुरुंगात आहेत. लालूंच्या जामिनावर शुक्रवारी सरन्यायाधीश पी.सदाशिवम आणि न्या.रंजना गोगोई यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. लालूंच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सीबीआयनेही लालूंच्या जामिनास विरोध के ला नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत. जामिनातील अटी-शर्ती,जामिनाचा बाँड आणि मुचलका याबाबत कनिष्ठ न्यायालय निर्णय घेईल. त्यानंतर लालू तुरंगातून बाहेर येऊ शकतील.
लालूंकडून युक्तिवाद
* चारा घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांसह
इतर 37 दोषींना जामीन मंजूर
झाला आहे.
* शिक्षेविरुध्द उच्च न्यायालयात आव्हान याचिका प्रलंबित आहे.त्यावरील निकालास सात-आठ महिने लागू शकतात.
* लालू एक वर्षांची शिक्षा भोगले आहेत. सुनावणीवेळेस दहा महिने आणि शिक्षेनंतर दोन महिने दहा दिवस तुरुंगात घालवले आहेत.