आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Completing Election In Nighbouring Countries Then India Deciding Foreign Policy

शेजारील राष्‍ट्रांमधील निवडणूकांनंतरच भारत निश्चित करील परराष्‍ट्र धोरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचे परराष्‍ट्र धोरण शेजारील राष्‍ट्रांबरोबर कसे असेल हे त्या राष्‍ट्रांमधील निवडणूकांनंतर निश्चित होईल. तसेच भारतातही पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहेत. या सर्व घटनांचा विचार करून भारतीय परराष्‍ट्र धोरणाची आखणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चीन आणि जपान या दोन राष्‍ट्रांमधील संबंध सद्य:स्थितीत तणावपूर्ण आहेत. त्यामुळे चीन भारताबरोबर आपले संबंध सुधारणेकरिता प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात चीनचे नवनियुक्त पंतप्रधान भारताच्या दौ-यावर येत आहेत. मात्र चीन ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्‍यात येत असलेल्या धरणाबाबत मौन बाळगून आहे.


मेमध्‍ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. इराणमध्‍ये जुलै, बांगलादेशमध्‍ये या वर्षाच्या शेवटी, अफगाणिस्‍तानमध्‍ये नव्यावर्षात, भूतानमध्‍ये जुलै महिन्यात निवडणूक होत आहेत. या राष्‍ट्रांमध्‍ये नवनियुक्त सरकार येणार आहे. त्यांच्याबरोबर कशा पध्‍दतीचे संबंध असावे याबाबत भारत आपली रणनिती आखत आहे. बांगलादेशशी भारताचे संबंध चांगले आहेत. पाकिस्तान आणि मालदीव या देशांशी सध्‍या आपल्या देशाचे संबंध दुरावत चालले आहेत. तेथील निवडणूकानंतरच त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधाची फेररचना करण्‍यात येणार
आहे.