आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Court Rap, Centre Sets Up GoM On CBI Autonomy

‘पोपटा’च्या सुटकेसाठी चिदंबरम यांचा मंत्रिगट !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वोच्च तपास संस्था सीबीआयला स्वायत्तता देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पंतप्रधानांनी मंगळवारी यासाठी मंत्रिगट (ग्रुप ऑफ मिनिस्टर्स) स्थापन केला. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील हा मंत्रिगट सीबीआयच्या स्वायत्ततेसाठी उपाययोजना सुचवेल.

या मंत्रिगटात चिदंबरम यांच्याशिवाय कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि नारायण सामी यांचा समावेश असेल. तसेच सीबीआयच्या वतीने संचालक रणजित सिन्हा विशेष निमंत्रित असतील. भाजपने मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णय निर्थक असल्याचे म्हटले आहे.

पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटले आहे की, ‘काँग्रेस आणि त्यांच्या मंत्र्यांनीच सीबीआयला पोपट केले आहे. आता तेच लोक या तपास संस्थेला मुक्त करण्यासाठी काय उपाय सुचवणार? यासाठी त्रयस्थ लोकांचा गट किवा समिती स्थापन करून सल्ला घ्यायला हवा.’

मंत्रिगटाची जबाबदारी काय?
सीबीआयला स्वायत्तता देण्यासाठी कायदेशीर उपाय, पद्धती तसेच पर्यायांवर मंत्रिगट विचार करेल. याशिवाय तपास कामात सीबीआयवर दबाव येऊ नये म्हणून कायदेशीर तरतूदही सुचवेल. कायदेशीर मसुद्यासंबंधी सरकारला 3 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे. मंत्रिगट हा मसुदा तयार करेल.

आव्हाने आणि उपाययोजना
1. सीबीआयला सध्या गृह, कार्मिक, पीएमओ आणि कायदा ही चार मंत्रालये तसेच लोकसेवा आयोगाकडून तपास सोपवला जाऊ शकतो.
2. नियमानुसार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय तपासावर सीव्हीसीची देखरेख. ती बंद होऊ शकते. यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल.
3. निवडणूक आयोग आणि लोकसेवा आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या धर्तीवर सीबीआयला पूर्ण स्वायत्तता बहाल केली जाऊ शकते. मात्र, यासाठी नवा कायद्याची निर्मिती करावी लागेल.

सरकारी हस्तक्षेपाची उदाहरणे
0 यूपीए सरकारला पाठिंबा दिला नाही तर सीबीआयचा ससेमिरा मागे लावतील : मुलायमसिंहांचे वक्तव्य.
0 द्रमुकने केंद्राचा पाठिंबा काढताच करुणानिधींच्या मुलाच्या घरी छापे टाकण्यात आले होते.यावर चिदंबरम यांनी नाराजी व्यक्त केली होती.
0 सीबीआयच्या दबावामुळे अनेकदा राजकीय तडजोडी कराव्या लागतात, असे मायावती म्हणाल्या होत्या.