आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Delhi High Court's Advice, Arrested Arvind Kejriwal Agrees To File Bail Bond

केजरीवाल ‘तिहार’ बाहेर; ‘आप’चा फंडा उच्च न्यायालयात फसला, बाँड भरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वैयक्तिक जातमुचलका भरणार नाही, या मुद्द्यावर अडून बसल्यामुळे तिहार तुरुंगाची हवा खावी लागलेल्या आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अखेर मंगळवारी वैयक्तिक जातमुचलका भरला आणि ते तिहार तुरूंगाबाहेर आले.
तत्पूर्वी तसे न करण्याची भूमिका घेतल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी महानगर दंडाधिकारी गोमती मनोचा यांच्या समोर केजरीवाल यांनी भरलेला जामिनासाठीचा वैयक्तिक जातमुचलका सादर केल्यानंतर केजरीवाल यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मानहानीच्या प्रकरणात केजरीवाल यांनी वैयक्तिक जातमुचलका भरून जामीन घेण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांनी फेब्रुवारीमध्ये देशातील भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यात गडकरी यांच्या नावाचाही समावेश होता. त्यानंतर गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात आधी केजरीवाल समन्स जारी होऊनही न्यायालयात हजर राहिले नव्हते. 21 मे रोजी ते न्यायालयात हजर राहिले. तेव्हा वैयक्तिक जातमुचलका भरून अटक टाळू शकता, असे न्यायालयाने त्यांना सांगितले होते; पण त्यांनी जातमुचलका भरण्यास नकार दिला. ते निर्णयावर ठाम राहिल्याने त्यांना अटक करून तिहार तुरुंगात टाकण्यात आले होते.
आधी केजरीवाल यांना 23 मेपर्यंत आणि नंतर 6 जूनपर्यंत तिहार तुरुंगात टाकण्यात आले. महानगर दंडाधिकार्‍यांच्या निर्णयाच्या विरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. कैलास गंभीर आणि सुनीता गुप्ता यांच्या न्यायपीठाने सुनावणी केली.

पुढील स्लाइडमध्ये, उच्च न्यायालयाच्या कानपिचक्या...