आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरी सल्ल्यानंतरही प्रोटीन पावडर जोरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील मध्यमवर्गीयांची वसाहत हडसन लेनमध्ये दुपारी साडेचारची वेळ. सूर्य आग ओकतोय. तापमान ४२ अंशांवर पोहोचलेले. येथील द्रोणाचार्य जिममध्ये १४ ते १५ वयोगटातील तरुण व्यायाम करत आहेत. १६०० चौ. फुटांच्या जिममध्ये २७ वर्षीय भीमसिंह १८५ किलो वजनासोबत बँच प्रेसचा सराव करत आहे. तो जूनमध्ये होणाऱ्या युरोपीय चॅम्पियनशिपची तयारी करत अाहे. असेच काहीसे चित्र देशातील अनेक शहरांमध्ये आहे.
स्मार्ट लूक मिळवण्याची क्रेझ तरुणांमध्ये वाढली आहे. मात्र,चांगले मसल आणि बॉलीवूड हीरोसारखे सिक्स पॅक बनवण्याच्या मोहापायी प्रोटीन पावडरसह डायट्री सप्लिमेंट्ससारख्या गोळ्या, एनर्जी ड्रिंकचा खप जवळपास १८ ते २० टक्क्यांनी वाढला आहे. सन २०१५ पर्यंत डाएट्री
सप्लिमेंट्सची विक्री ६ ते ६.५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल.

देशात १५ टक्के वेगाने जिमची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. युरोपीय देश आणि अमेरिकेत जिमला जाणाऱ्यांची संख्या १० ते १६ टक्के आहे. भारतात हा आकडा अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी आहे. कोणत्याही जिमने प्रोटीन ब्रँड पावडर देत नसल्याचे अधिकृतरीत्या सांगितले. मात्र, एका जिम संचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, २० ते २५ टक्के कमिशनच्या बदल्यात अन्य काही जिम तरुणांना असे ब्रँड घेण्याचा सल्ला देत आहेत. देशातील ७८ शहरांत १५० जिम चालवणारे तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेसचे एमडी आणि सीईओ प्रशांत तळवलकर म्हणाले, आता दोन आणि तीन दर्जाच्या शहरांमध्येही जिम आणि जिममध्ये जाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. जेवणातून प्रोटीनची गरज पूर्ण होत
नाही त्यामुळे पूरक आहार द्यावा लागतो. आमचे डॉक्टर्स आणि प्रशिक्षक हा सल्ला देतात मात्र, कोणते प्रॉडक्ट किंवा ब्रँड घ्यावा हे आम्ही सांगत नाहीत.

द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि द्रोणाचार्य द जिमचे प्रवर्तक भूपेंद्र धवन म्हणाले, जिममध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मसल तयार करण्यासाठी प्रोटीन पावडर चांगली असते. मात्र, बाजारात बनावट उत्पादने खूप आली आहेत.
याबरोबर जिम संचालक २० ते २५ टक्के कमिशन घेऊन प्रोटीन पावडर घेण्याचा सल्ला देतात. आम्ही आमच्या जिममध्ये येणाऱ्यांना भिजवलेला हरभरा, मूग डाळ, शेंगदाणे आणि साेयाबीन खाण्याचा सल्ला देतो. याबरोबर काजू, मनुका आणि बदामचे १५-२० दाणे रोज खाण्यास सांगतो.
धवन यांच्या म्हणण्यानुसार, बनावट पावडरची समस्या आणखी वाढली आहे. चांदणी चौक, सदर बाजारसारख्या क्षेत्रात अस्सल उत्पादनापेक्षाही चांगल्या पॅकिंगमध्ये १२०० - १५०० रुपयांचा प्रोटीन पावडरचा डबा सात हजार रुपयांपर्यंत मिळतो.

यामुळे यकृतावर परिणाम होऊन आतड्यांवर सूज येते. देशात व्हिटॅमिन आणि डाएट्री सप्लिमेंट बाजारपेठेत २० टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी असणारी कंपनी अॅमवे इंडियाचे रिजनल हेड संदीप प्रकाश म्हणाले, इंडियन काैन्सिल ऑफ मेडिल रिसर्चनुसार व्यक्तीला प्रतिकिलो वजनानुसार एक ग्रॅम प्रोटीन घेतले पाहिजे. उदा. व्यक्तीचे वजन ६० किलो असेल तर ६० ग्रॅम प्रतिदिन डाएट असायला हवे.

गरोदर महिला आणि आजारी व्यक्तीसोबत निरोगी व्यक्तीलाही त्याची आवश्यकता आहे. आमचे कोणतेही प्रोटीन पावडर आणि अन्य उत्पादनांसाठी कोणत्याही जिमशी किंवा इन्स्टिट्यूटशी
टायअप नाही.

९० टक्के खरेदीदार तरुण
तरुणांमध्ये शरीरसौष्ठवाची क्रेझ असल्यामुळे डाएट्री सप्लिमेंटची विक्री वाढत आहे. डाएट्री सप्लिमेंटच्या विक्रीत प्रोटीन पावडरचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये ९० टक्के तरुण आहेत.
अनुप खन्ना, अध्यक्ष, केमिस्ट संघटना नाेयडा

६ हजार कोटी... १५ % जिममध्ये वाढ
गोल्डन जिमचे जनरल मॅनेजर निखिल कक्कड म्हणाले, देशात तंदुरुस्त व स्मार्ट दिसण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात सध्या दरवर्षी जिमची वाढसाधारण १५ टक्के आहे. आम्ही कोणत्याही ब्रँड किंवा सप्लिमेंट्सना हँड आऊट करत नाहीत.

७८ % शहरी तरुण
>असोचेमच्या सर्वेक्षणानुसार, ७८ टक्के शहरी तरुण डाएट्री सप्लिमेंटचे सेवन करत आहेत.
>प्रोटीन पावडरचा वापर करत असल्याचे ४७ % लोक सांगतात. ८५ % शाळा-महाविद्यालय प्रशिक्षक सप्लिमेंट्सचा सल्ला देतात.
>असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत म्हणाले, देशात प्राेटीन पावडर/डाएट्री सप्लिमेंट बाजारपेठेत १८ ते २० टक्क्यांनी वाढत आहे.
>जिम-फूड सप्लिमेंट्स बाजारपेठ ४० % प्रतिवर्ष वेगाने वाढत आहे.