आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपानंतरही नजीकची भारतीय धरणे सुरक्षित, केंद्रीय जल आयोगाची पाहणीनंतर माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेपाळलगत असलेल्या भारताच्या राज्यांतील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे. नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपानंतर आयोगाच्या अधिका-यांनी बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांत असलेल्या धरणांची पाहणी केली. या धरणांना भूकंपानंतर कोणताही धोका निर्माण झाला नसल्याचे पाहणीत दिसून आले.

२५ एप्रिल रोजी नेपाळमध्ये ७.९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाल्यानंतर भारतात बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब आणि आंध्र किनारपट्टीवरही धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाअंतर्गत जलआयोगाने माहिती घेतली.

देशात एकूण ५,१०० मोठी धरणे
>उत्तर प्रदेशात ११५, बिहारमध्ये २३ आणि उत्तराखंडमध्ये १६ मोठी धरणे आहेत.
>ज्या धरणाची उंची १५ मीटरपेक्षा अधिक आहे अशी धरणे मोठे प्रकल्प म्हणून ओळखले जातात.
>धरणाच्या माथ्यापासून सर्वात खोली असलेला पाया अशी धरणांची उंची मोजली जाते.
>१० ते १५ मीटरपर्यंत उंची असलेली धरणे पण मोठ्या प्रकल्पांत समाविष्ट करण्यात येत असली तरी त्यासाठी पाच निकष आहेत. यात प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता हा महत्त्वाचा निकष असून एक दशलक्ष घन मीटरपेक्षा ही क्षमता कमी नसावी.

नेपाळला भूकंपाचे तीन धक्के
नेपाळला गेल्या २५ एप्रिल रोजी झालेल्या मोठ्या भूकंपानंतर धक्क्यांची मालिका सुरूच असून रविवारी बसलेल्या तीन नव्या धक्क्यांमुळे लोक पुन्हा प्रचंड धास्तावले. दरम्यान, मृतांची संख्या ८ हजारांवर गेली असून अजूनही काही भागांत मदतकार्य सुरू आहे. जखमींची संख्या १६ हजार ३३ वर पोहोचली आहे. नेपाळच्या अनेक भागांत दरडी कोसळल्याने मदतकार्यात बाधा निर्माण होत असून गिर्यारोहकांचे आवडते स्थान असलेल्या लांगटंग भागात मदत व बचाव पथकांना ९० मृतदेह सापडले असून यात ९ परदेशी गिर्यारोहकांचा समावेश आहे. लेफ्ट कर्नल अनुप थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने या भागांत मदतकार्यात बाधा येत असून बचाव पथकेही सुरक्षित स्थळी थांबत आहेत.दरम्यान, रविवारी नव्या तीन भूकंप धक्क्यांमुळे संपूर्ण नेपाळ पुन्हा हादरले. मोठ्या भूकंपानंतर ४ किंवा त्यापेक्षा अधिक रिश्टरचे १५६ धक्के बसले.
बातम्या आणखी आहेत...