आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ATM मध्ये नोटा भरणारे कर्मचारी घरी जाऊ शकत नाहीत, खाणे-पिणे सर्व ऑफिसातच; दिवसातून दोनदा भरणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सुमारे डझनभर कॅश लॉजिस्टिक कंपन्या देशभरात एटीएममध्ये नोटांचा भरणा करतात. नोटाबंदीनंतर बहुतांश एटीएम चार ते पाच तासात रिकामे होत आहेत. या कंपन्यांचे 40 हजार कर्मचारी सुमारे 9 हजार व्हॅनद्वारे दिवसरात्र तीन पाळ्यामध्ये रोख रक्कम भरत आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांना आठवडाभर घरी जाता आले नाही. तंबू टाकून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सीएलआयचे अध्यक्ष रितुराज सिन्हा यांनी म्हटले, या कामासाठी एक ते सव्वा लाख लोकांची गरज आहे.

एटीएमचे गणित : 60 टक्के दिवसातून दोनदा भरणा
> 15000 कोटी रुपये दिवसभरात देशातील एटीएममध्ये लोड
> देशात 2.20 लाख एटीएम, सर्व सुरु झाले आहेत.
> 50 हजार एटीएम 500 आणि 2000च्या नोटांसाठी कॅलिब्रेट
> सद्यपरिस्थितीत 1.25 लाख कर्मचाऱ्यांची गरज
> 60 टक्के एटीएममध्ये दिवसातून दोनहून अधिक वेळा भरणा
> एटीएममध्ये कॅलिब्रेशननंतर 60 लाख रुपये टाकता येतील.
> सध्या 100 च्या नोटा चार लाख रुपये मूल्यांपर्यंत येताहेत

पुढील स्लाइडवर वाचा... एटीएम पूर्ववत कधीपासून चालू होतील?
बातम्या आणखी आहेत...