आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Eggs, Black Ink Thrown At Arvind Kejriwal In Varanas

दिग्गज नेत्यांवर का फेकली जाते काळी शाई? वाचा, FUNNY FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज कुठे ना कुठे आणि कोणावर तरी शाई फेकली जात आहे. ज्यांना काळी शाई फासली जाते, ते प्रामुख्याने कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे नेते असतात. त्याशिवाय त्यांच्यावर शाई हल्ला होत नाही. अशा हल्ल्यातून लवकर प्रसिद्धी देखील मिळते.
तुम्हाला वाटत असेल आज आम्ही या मुद्यावर का चर्चा करत आहोत. तर, आज केजरीवाल वाराणसीत जिथे जातील तिथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. केजरीवाल यांच्यासह त्यांचे सर्व 'आम आदमी' देखील या 'शाई हल्ल्यात' काळे झाले आहेत.
तर, आपला मुळ मुद्दा, नेत्यांवर शाई का फेकली जाते. याची आम्ही काही कारणे शोधून काढली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. या व्यतिरीक्त तुमच्याही डोक्यात काही वेगळी कारण असेल तर ते खाली दिलेल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये नोंदवू शकता.
शाई हल्ल्याची कारणे
1 - फेकणे सोपे असते, त्यासाठी फार तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज नाही.
2 - स्वस्त आहे.
3 - फार काळ चेह-यावर राहाते.
4 - कमी मेहनीतीमध्ये काम होते.
5 - विरोध दर्शविण्याचा सोपा मार्ग.
6 - फार काही प्लॅनिंग करावी लागत नाही.
7 - शाई घेऊन जाण्यासही सोपी असते.
8 - ज्याच्यावर हल्ला करायचा त्याच्या आणि फेकणा-याच्या जीविताचा कोणताही धोका नाही.
9 - शिक्षाही मोठी होत नाही.
10 - कार्यक्रम त्यामुळे थांबत नाही. पुन्हा पूर्ववत सुरु होतो.
11- हिंसक नाही मात्र परिणामकारक आहे.
12 - देशभरातील वृत्तवाहिन्या प्रसिद्धी देतात. ब्रेकिंग न्यूज बनते.
13 - मोठ्या मनुष्यबळाची गरज नाही.
14 - शाई हल्ल्यानंतर पीडित पक्ष सर्व हकिकत माध्यमांना स्पष्ट करु शकतो.
15 - सर्वात मोठी गोष्ट, शाई फेकणारा हा नेहमी 'आम आदमी' असतो.