आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींनंतर आता सुषमा स्वराज, राजनाथांचीही हेरगिरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हेरगिरी करणारी उपकरणे सापडल्यावरून खळबळ माजलेली असताना आता राजनाथसिंह आणि सुषमा स्वराज या ज्येष्ठ मंत्र्यांच्या घरीही अशीच हेरगिरी झाली असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे.
राजनाथ आणि स्वराज यांच्या घरीही हेरगिरीसाठी आधुनिक यंत्रे (लिसनिंग डिव्हाइस) सापडली होती. भाजपने याचे तातडीने खंडन केले, तर केंद्राच्या वतीने कुणीही अद्याप भाष्य केलेले नाही. दुसरीकडे काँग्रेस हा मुद्दा संसदेत आक्रमकपणे मांडून सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे.