आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST: घर बांधणे स्‍वस्‍त होणार; ग्राहकांना लाभ न मिळवून दिल्यास बिल्डरांवर होईल कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जीएसटी लागू झाल्यावर बांधकाम सुरू असलेले फ्लॅट्स, घर आणि संकुले बनवण्याचा खर्च कमी होईल. बिल्डरना त्याचा फायदा ग्राहकांना द्यावा लागेल. एखाद्या बिल्डरने तसे केले नाही तर त्याला नफेखोरी संबोधावे लागेल. त्यावर बिल्डरच्या विरोधात जीएसटी कायद्याच्या कलम १७१ अंतर्गत कारवाई होईल.
 
बांधकाम सुरू असलेले फ्लॅट, संकुले आदींसाठी बांधकाम सेवेवर जीएसटीत कराचा दर १२% निश्चित करण्यात आला आहे. बिल्डर लोकांकडून १ जुलैच्या आधी संपूर्ण रक्कम मागत आहेत, त्यानंतर जास्त कराची भीती दाखवत आहेत, अशा तक्रारी सरकारला मिळत आहेत. त्यामुळे अर्थ मंत्रालयाने वक्तव्य जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. नफेखोरी रोखण्यासाठीचे नियम १८ जुलैला जीएसटी परिषदेत निश्चित होतील. मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्या बांधकाम साहित्यावर अबकारी, व्हॅट आणि प्रवेश कर लागतो. पण त्याचे इनपुट क्रेडिट मिळत नाही. जीएसटीत संपूर्ण क्रेडिट मिळेल. म्हणजे बिल्डर या सर्वांवर जेवढा कर देईल, पुढे त्याला तेवढा कमी द्यावा लागेल. फ्लॅट/ घर खरेदी केल्यावर सध्या ४.५% सेवा कर लागतो. जीएसटीत त्या सर्वांऐवजी फक्त १२% कर लागेल. बिल्डरला मिळणारे इनपुट क्रेडिट १२% कर अॅडजस्ट करण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे त्यांना क्रेडिटच्या रिफंडची परवानगी देण्यात आली नाही.
 
सध्या साहित्यावर ३०% पर्यंत कर, इनपुट क्रेडिटही नाही :  बहुतांश बांधकाम साहित्यावर १२.५% अबकारी कर लागतो. हे. व्हॅटही १२.५% ते १४.५% पर्यंत आहे. राज्य २% पर्यंत प्रवेश कर लावतात. व्हॅट आणि प्रवेश कर अबकारीवरही लागतो. त्यामुळे एकूण कर २९% ते ३०% पर्यंत होतो. सध्या त्याचे कुठलेही इनपुट क्रेडिट मिळत नाही. बिल्डर हा कर चुकवतात आणि फ्लॅट/घराच्या किमतीत जोडून ग्राहकाकडून पैसे घेतात. ग्राहकाला फक्त सेवा करच दिसतो. कारण फ्लॅट घेताना ४.५% सेवा करच द्यावा लागतो. संयुक्त योजनेत १% ते २% व्हॅटही आहे. खरेदीदाराला फक्त हाच ५.५-६.५% करच दिसतो.
 
जीएसटीत फक्त १२% कर : बांधकाम साहित्यावर अबकारी, व्हॅट, प्रवेश कराच्या रूपात जी रक्कम चुकवली, तिचे बिल्डरला इनपुट क्रेडिट मिळेल. फ्लॅट/घराच्या विक्रीवर सेवा कर आणि कंपोझिशन करही संपेल. त्याऐवजी फक्त १२% कर लागेल. बिल्डरला जे इनपुट क्रेडिट मिळेल, ते १२% कर अॅडजस्ट करण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे त्यांना क्रेडिट रिफंड करण्याची परवानगी नाही.

बदललेल्या करामुळे तुमचे घर, स्वयंपाक घर आण दररोजच्या वापराच्या वस्तूंवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी खालील यूआरएल क्लिक  करून..
>आयपीएल सामना पाहायचा वा थीम पार्क, वॉटर पार्कचा आनंद लुटणेही 11% महाग होणार
> GST नुसार करांचे दर निश्चित: व्हॅट रद्द झाल्याने धान्य स्वस्त, चहा-कॉफीवर 13% कर कमी, कार स्वस्त होणार
> Alto, Kwid आणि Swift अशा छोट्या गाड्या महागणार, सर्व प्रकारच्या कारवर 28% युनिफॉर्म टॅक्स
> जीएसटी : आयात वस्तू महागल्याने देशांतर्गत उद्योगाला फायदा,5 % व्यावसायिकांची तपासणी
> व्यापारी-ग्राहकांसाठीही जीएसटी करपद्धती सुलभ; अधीक्षक दीपक गुप्ता यांचे चर्चासत्रात प्रतिपादन
> जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तू होतील स्वस्त, तर सेवा महागणार : जेटली
> जीएसटी: दरमहा अपलोड करावेच लागतील व्यवहार, संगणक साक्षर अकाउंटंटची मोठी गरज भासणार
> जीएसटी: भेट, चोरी, नष्ट वस्तूंचीही लागेल नोंद; उत्पादन, विक्री अन् सेवा सर्वांसाठी स्वतंत्र नोंद
> जीएसटी विधेयके लोकसभेत पारित; महागाई वाढणार नाही : अरुण जेटली
 
बातम्या आणखी आहेत...