आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाने जपानवर पुन्हा डागले क्षेपणास्त्र, अॅबे म्हणाले- आता सहन करणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राने 3700 किमी अंतर पार केले असून 770 किमी उंचीपर्यंत गेले. - Divya Marathi
दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राने 3700 किमी अंतर पार केले असून 770 किमी उंचीपर्यंत गेले.
सिओल - नॉर्थ कोरियाने पुन्हा एकदा जपानवर बॅलेस्टिक मिसाइल डागली आहे. गत 18 दिवसांत नॉर्थ कोरियाने जपानवर दुसऱ्यांदा मिसाइल डागली आहे. 3 सप्टेंबर रोजीच एन. कोरियाने 6वे अणुचाचणी (हायड्रोजन बॉम्ब) केली होती. नॉर्थ कोरियाने जपानवर सातत्याने मिसाइल डागल्याने भूक्षेत्रात तणाव आणखी वाढला आहे. जपानचे संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्याशी आपत्कालीन बैठक घेतली. हायड्रोजन बॉम्ब टेस्टनंतर यूएनने नॉर्थ कोरियावर आणखी कडक निर्बंध लादले होते. जपानचे पीएम शिंजो अॅबे म्हणाले- नार्थ कोरियाच्या या चिथावणीखोर कृत्याला सहन केले जाणार नाही.
 
3700 किमी दूर गेली मिसाइल
- वृत्तसंस्थेनुसार, साऊथ कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, नॉर्थ कोरियाची मिसाइल बहुतेक 3700 किमी अंतरापर्यंत गेली आणि ती 770 किमी उंचीपर्यंत गेली होती.
 
अमेरिकीने केले कन्फर्म
- अमेरिकी पॅसिफिक कमांडने कन्फर्म केले की नॉर्थ कोरियाची ही मिसाइल इंटरमीडिएट रेंज बॅलेस्टिक मिसाइल (IRBM) होती. परंतु यामुळे अमेरिका वा पुन्हा प्रशांत महासागरात अमेरिकीच्या अधिपत्याखालील गुआम बंदराला कोणताही धोका नाही. परंतु, यामुळे या खंडात तणाव मात्र वाढला आहे.
- इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे जोसेफ डेन्प्सी म्हणाले की, नॉर्थ कोरियाच्या या मिसाइलने आतापर्यंतचे सर्वात जास्त अंतर कापले आहे.
- मिसाइल जपानवरून जाताच होक्काइदो आयलँडच्या दक्षिणी भागात केप एरिमोमध्ये लाऊडस्पीकरवर अनाउन्स करण्यात आले- "मिसाइल लाँच झाले आहे."
 
जपानचे काय आहे म्हणणे?
- जपानचे पीएम शिंजो अॅबे म्हणाले की, नॉर्थ कोरियाच्या या चिथावणीखोर कृत्याला आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही किम जाँग उनला याचे प्रत्युत्तर नक्कीच देऊ.
- जपान सरकारचे मुख्य प्रवक्ते योशिहिदो सुगा म्हणाले की, उत्तर कोरियाला याचे कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले जाईल.
 
काय म्हणतात अमेरिकी एक्स्पर्ट?
- सेंटर फॉर नॅशनल इंटरेस्ट डायरेक्टर ऑफ डिफेन्स स्टडीजचे हॅरी जे कजियानिस म्हणाले, नॉर्थ कोरियाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय संघटनेला मूर्खात काढून मिसाइल डागली आहे. ही मिसाइल जपानच्या आकाशातून निघून गेली. मिसाइल लाँच वा नॉर्थ कोरियाच्या अशा कृत्याचे आम्हाला थोडेही आश्चर्य वाटत नाही.
- निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय दबाव असूनही उत्तर कोरिया त्यांचा अणु कार्यक्रम राबवत आहे. दीर्घ काळापासून ते अत्याधुनिक मिसाइल आणि अण्वस्त्र बनवण्यात गुंतले आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला त्याच्या आणखी काही अणुचाचण्या पाहाव्या लागतील.
- व्हाइट हाऊसने म्हटले की, दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प या मिसाइल लाँचवर ब्रीफिंग करतील.
 
आतापर्यंत काय-काय केले उत्तर कोरियाने
- उत्तर कोरियाने 6 अणुचाचण्या केल्या आहेत.
- या वर्षी एप्रिलमध्ये हुकूमशहा किम जोंग-उन याने समुद्रात लाइव्ह फायरिंगचे प्रात्यक्षिक केले. ही उत्तर कोरियाची आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी कवायत होती.
- एप्रिलमध्येच उत्तर कोरिया स्थापना दिनाच्या निमित्ताने या क्रूर हुकूमशहाने परेडमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले होते.
- याच वर्षी फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत उत्तर कोरियाने अनेक मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. यातील बहुतांश क्षेपणास्त्रे जपानच्या दिशेनेच डागण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...