आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Indiraji Assasination Pravanda Become Prime Minister Narendra Modi

इंदिराजींच्या हत्येनंतर प्रणवदांना पंतप्रधान करायला हवे होते - नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोलकात्यात भाजपच्या जनचेतना सभेत तृणमूल काँग्रेस व डाव्या पक्षांवर टीकास्र सोडले खरे, मात्र मतांचा जोगवा मागितला राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावाने! मोदी म्हणाले, प्रणवदांना दोन वेळा पंतप्रधान होण्यापासून रोखण्यात आले. पहिल्या वेळेस- इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा. त्याकाळी राजीव गांधी कोलकात्यातच होते. प्रणव मुखर्जी तेव्हा सर्वात वरिष्ठ मंत्री असल्याने त्यांनाच पंतप्रधान केले गेले पाहिजे होते. मात्र राजीव गांधींनी तर त्यांना मंत्रिमंडळातूनच काढून टाकले. दुस-या वेळेस - 2004 मध्ये सोनिया गांधींनी पीएमपद स्वीकारण्यास नकार दिला होता तेव्हा. ज्येष्ठतेनुसार तेव्हाही पीएमपदाची संधी प्रणवदांना मिळायला हवी होती. मात्र ऐनवेळी मनमोहनसिंह यांच्या गळ्यात माळ पडली. बंगालने ही बाब लक्षात ठेवायला हवी, असेही मोदी म्हणाले.
काँग्रेस-भाजप विरोधातून आकारास येत असलेल्या तिस-या मोर्चावरही मोदींनी वाक्बाण सोडले. तिस-या मोर्च्याच्या लोकांनी पूर्व भारताला विकासापासून वंचित ठेवत त्यांना थर्ड ग्रेड बनवले. देशालाही बर्बाद केले. त्यांना देशाच्या राजकारणापासून लांबच ठेवले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
मोदी यांनी गांधी कुटुंबावर हल्ला केल्यानंतर कॉँग्रेसने परतफेड करण्यास उशीर केला नाही. कॉग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचे तत्काळ वक्तव्य आले. ते म्हणाले, केशुभाई पटेल यांचा कशा प्रकारे अवमान करण्यात आला हे मोदी यांनी विसरू नये. हिरेन पंड्या-संजय जोशी कसे बळी गेले? अडवाणी यांना कोणी आडबाजूला टाकले?
ममतांबद्दल मवाळ का?
मोदी भविष्यातील शक्यता पडताळत आहेत. निवडणुकीनंतर गरज पडल्यास ममता यांना बरोबर घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वाजपेयी सरकारला ममता यांचा पाठिंबा मिळाला होता. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. यातील 19 तृणमूल कॉँग्रेसकडे आहेत.
प्रणवदांचा उल्लेख का?
लोकांना भावनिक आवाहन करण्यासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. राष्‍ट्रपती निवडणुकीवेळी त्यांना बंगालच्या पार्श्वभूमीचा उपयोग झाला होता. माकपा, भाकपा आणि तृणमूलने प्रणव मुखर्जी यांना याच आधारावर मत दिले होते.
मुस्लिमांशी जवळीक
धर्मनिरपेक्षतेची माझी व्याख्या स्पष्ट आहे. सरकारचा एकच धर्म असतो तो म्हणजे राष्‍ट्रवाद. प. बंगालचा हज यात्रेकरूंचा कोटा 12 हजार आहे. अर्ज येतात 11 हजार. गुजरातचा हज कोटा आहे 4800, अर्ज येतात 37 हजार. याचे कारण तेथील लोकांच्या खिशात पैसे आहेत.
तरुणांना साद
राजकारणामध्ये गुंडगिरी, दररोज संप, विजेविना सर्वत्र अंधार आहे. सुभाषबाबू म्हणाले होते, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दुंगा. तुम्हाला स्वराज्य देईन. बांगलादेशी तरुणांचा रोजगार हिसकावत आहेत. देशात बंगालपासूनच संगणक क्रांतीला सुरुवात झाली.
जनतेला आवाहन
तुम्ही सर्वाचा अनुभव घेतला आहे. मात्र, काय झाले? बंगाल आजही विकासापासून दूर आहे. आता तुम्ही माझा अनुभव घेऊन पाहा. मला सर्व जागा द्या, मग माझ्याकडे संपूर्ण देशाचा हिशेब मागा. माझ्या जागा निवडून आणल्यावर मला येथे यावे वाटेल. बंगालने भाजपचा स्वीकारण्याची वेळ आली आहे.