आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Lalkrushna Advani Resignation Comments Of Political Leaders

पडसाद : अडवानींचा राजीनामा म्हणजे \'दाल मे कुछ काला है\'- शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आज भाजपमधील सर्व पदाचा त्याग केल्यानंतर राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी अडवानी यांच्या राजीनाम्याबाबत आश्यर्य व्यक्त केले आहे. तर भाजपमधील नेत्यांनीही अडवानींच्या निर्णयाने धक्का बसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने अडवानींना सहानुभती दाखवत मोदींना पक्षातंर्गत होणारा विरोध पाहता आनंद व्यक्त केला आहे. तर, देशातील इतर राजकीय पक्षांनीही याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.


पुढे पाहूया कोणी काय-काय प्रतिक्रिया दिली ती...

- लालकृष्ण अडवानी हे एनडीएचे मोठे नेते असून ते जर नाराज असतील त्यांची मनधरणी करुन त्यांना परत पक्षात आणून सन्मान दिला पाहिजे- शिवसेना

- मोदींना पक्षांतर्गतच मोठा विरोध आहे. मात्र काही नेत्यांच्या जीवावर ते स्वार होत आहेत. अडवानींनी दिला राजीनामा म्हणजे 'दाल मे कुछ काला है', हेच सिद्ध होते.- शरद पवार

- लालकृष्ण अडवानी हे 'साठी बुद्धी नाठी' झाले असून ते सटकलेले आहेत असे मत भाजपचे निलंबित नेते व राज्यसभेतील खासदार राम जेठमलानी यांनी व्यक्त केले.

- अडवानी हे भाजप व एनडीएमधील महत्त्वाचे नेते असून, ही एक गंभीर घटना आहे व याचा एनडीएवर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत आमच्या पक्षाची बैठक घेण्यात येणार आहे.- शरद यादव, एनडीएचे निमंत्रक व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष.

- नरेंद्र मोदींना पुढे केल्यानेच अडवानी यांनी नाराज होऊन राजीनामा दिला आहे- जनार्दन त्रिवेदी, काँग्रेस प्रवक्ते.

- राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी नितीश यांच्यावर हल्लाबोल करीत म्हटले आहे की, अडवानींच्या राजीनाम्यामुळे जेडी(यू) ला लागलाच धक्का बसला आहे.