आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मॅगी\'नंतर FSSAI ने दिले \'नूडल\', \'पास्ता\' आणि \'मॅक्रोनी\'च्या परीक्षणाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय अन्न भेसळ नियंत्रक संस्थेने (एफएसएसएआय) 'मॅगी' पाठोपाठ नूडल्स, पास्ता व मॅक्रोनीचे उत्पादन करणार्‍या तसेच देशातील इतर ब्रँड्सच्या उत्पादनांच्याही परीक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कुठली ब्रँडेड उत्पादने आरोग्यास फायदेशीर आहेत आणि कुठली हानिकारक हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

एफएसएसएआयने सात कंपन्यांच्या उत्पादनांच्या परीक्षणाचे आदेश दिले आहेत. यात टाप रेमन, फूडल्स आणि वाय-वायसारख्या विविध नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनी ब्रॅंडचा समावेश आहे. याशिवाय 'मॅगी न्यूटिलिशस पास्ता विथ टेस्टमेकर'च्या चार उत्पादनाचे परीक्षण होणार आहे.
एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी वाय. एस. मलिक यांनी देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या खाद्य सुरक्षा आयुक्तांना पत्राद्वारे हे आदेश दिले आहेत. मॅगी आणि इतर उत्पादनांमध्ये भेसळ होत असल्यामुळे देशातील जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात विक्री होत असलेल्या विविध ब्रॅंड्‍सच्या उत्पादनांची चाचणी घेण्याचे या आदेशात म्हटले आहे.

एफएसएसएआयच्या आदेशानुसार,नेस्ले इंडिया, आयटीसी, इंडो निसिन फूड लिमिटेड, जीएसके कंज्झुमर हेल्थकेअर, सीजी फूड्स इंडिया, रची इंटरनॅशनल आणि एए न्यूट्रिशन लिमिटेड सारख्या ब्रँडचा या यादीत समावेश आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 'मॅगी'..बस 2 मिनिटे द्या, वाचा मॅगीचा इतिहास आणि करा विचार...