आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीनंतर रिटर्न भरणाऱ्यांना भरावा लागणार जादा कर; सुधारित रिटर्नची बारकाईने तपासणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नोटबंदीनंतर ज्या लोकांनी प्राप्तिकर रिटर्नमध्ये काही सुधारणा केल्या त्यांना अधिक कर भरावा लागू शकतो. सीबीडीटीने प्राप्तिकर अधिकाऱ्यांना या सुधारित रिटर्नची बारकाईने तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या लोकांकडील काळा पैसा उघड होईल त्यांना जादा दराने कर लावला जावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. दर किती असावेत, हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही. प्राप्तिकर धाेरण ठरवणारी सीबीडीटी ही सर्वोच्च संस्था असून संस्थेने सर्व विभागीय प्राप्तिकर अधिकाऱ्यांना २४ नोव्हेंबरला दोन पानांचे निर्देश पाठवले आहेत. सुधारित रिटर्न भरण्याच्या संधीचा गैरवापर करून काही लोक काळा पैसा रिटर्नमध्ये दाखवून पांढरा करू शकतात, अशी शंका आहे. सीबीडीटीने रिटर्नमध्ये अधिक बदल करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जावी, असा इशारा यापूर्वी सीबीडीटीने दिला होता.

 

बँकेत जमा ‘ते’ १६ कोटी बेनामी
नव्या बेनामी कायद्यानुसार दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने बँकेत जमा १५.९३ कोटी रुपये बेनामी असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम नोटबंदीनंतर डिसेंबरमध्ये रमेशचंद शर्मा नामक व्यक्तीने जमा केली होती. नंतर लगेच डिमांड ड्राफ्टने रक्कम काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच प्राप्तिकर खात्याने हा डिमांड ड्राफ्ट जप्त केला होता. नंतर चौकशीत रमेशचंद शर्मा नावाची कुणीही व्यक्ती प्राप्तिकर अधिकाऱ्यांसमोर आली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...