आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Pathankot Attack, India Looks At Delaying Foreign Secretary Talks

अजून दोन दिवस शोध मो‍हीम राबवणार, संरक्षण मंत्री पर्रिकरांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - वायू दलाच्‍या तळावर दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. आज (मंगळवारी) चौथ्‍या दिवशीही दशहतवाद्यांची शोध मोहीम सुरू असून, आतापर्यंत सहा दहशतवा़द्यांना कंठस्‍नान घातले. त्यांची DNA टेस्ट केली जाणार आहे. दरम्‍यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोनवरून पठाणकोटच्या हल्ल्याबाबत चौकशी करण्यासाठी हवी ती मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संरक्षमंत्र्यांचे मोठे वक्‍तव्‍य...

1. किती तास चालले एन्काउंटर
- ''एन्‍काउंटर केवळ 36 ते 38 तास चालले. शनिवारी रात्री 3.30 वाजताच्‍या सुमारास हे ऑपरेशन सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी 7.30 वाजता संपले. मात्र, आज (मंगळवार) चौथ्‍या दिवशीही दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे. ती अजून दोन दिवस सुरू असेल. काही न फुटलेले बॉम्‍ब या ठिकाणी असू शकतात. त्‍यामुळे आम्‍ही कुठलाही धोका पत्‍कारणार नाही. शहीद झालेल्‍या कुटुंबाच्‍या परिवारांची मी भेट घेणार आहे. ''
- ''कॅम्पसमध्‍ये तीन हजार सामान्‍य नागरिक आहेत. त्‍यांच्‍या सुरक्षेचा मोठा प्रश्‍न आहे. आम्‍ही सुरुवातीला त्‍यांच्‍या सुरक्षेला प्राधान्‍य दिले. तुम्‍हाला (मीडिया) जर विश्‍वास वाटल नसेल तर आत जावून पाहा. ''
2. पाकिस्तानचा सहभाग कसा ?
- ''दहशतवाद्यांकडे पाकिस्‍तान मेडचे साहित्‍य सापडले. चौकशी सुरू आहे.''
- ''एके 47, पिस्टल, नाइट व्हिजन आणि 40 ते 50 किलो बुलेट्स घेऊन ते आले होते. एनआयए याची चौकशी पूर्ण झाल्‍यानंतरच त्‍या बाबत बोलू. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत.''
- ''हे दहशतवादी भारतात कसे घुसले, हाच प्रश्‍न मला सतावतोय. चौकशी सुरू आहे. ''

3. किती दहशतवादी मारले गेले ?
- ''काही जागा अशा आहेत की जिथून दहशतवादी घुसखोरी करू शकतात. एकूण 6 दहशतवादी होते. मात्र, अजूनही शोध मोहीम सुरूच राहील. एका दहशतवाद्याच्‍या शरिरावर अजूनही आत्‍मघातकी स्फोटके आहेत. ते निकामी करण्‍याचे काम सुरू आहे.
- एकूण सहा दहशतवादी होते. दोन ठिकाणी त्‍यांच्‍या शरिराचे तुकडे सापडले. त्‍यांची डीएनए टेस्ट केल्‍यानंतरच समजू शकेल ते नेमके किती होते.
4. शहिदांबद्दल काय म्‍हटले ?
- ''एक कमांडोला वगळता कुणीही जवान थेट मोहिमेमध्‍ये शहीद झाला नाही. दुर्दैवाने जगदीशचंद्र शिकार ठरले. मृतमुखी पडलेल्‍या सर्वच जवानांना शहिदाचा दर्जा दिला जाईल. हवाल दलाच्‍या तळाला काही नुकसान झाले नाही. ''
'' ज्‍या ठिकाणी हल्‍ला झाला त्‍याची मी दीड तास पाहणी केली. सशस्त्र सेना, गरुडा आणि एनएसजी कमांडो यांचे मी आभार मानतो. त्‍यांनी हे ऑपरेशन तडीस नेले. ''
5. पंजाब सरकारबाबत काय म्‍हटले ?
'' पंजाब सरकार आणि बीएसएफबद्दल मी काहीच बोलणार नाही. कारण मी संरक्षण मंत्री आहे. दहशतवादी भारतात कुठून आणि कसे आले याची माहिती आहे. परंतु, चौकशी पूर्ण झाल्‍यानंतर ती उघड करू.''
6. चुकांबद्दल काय म्‍हणाले ?
''इटेलिजेंस इनपुटसंबंधी ऑपरेशनमध्‍ये काही गॅप्स आढळले. त्‍याची चौकशी सुरू असून, त्‍यात कळेलच चूक नेमकी कुठे झाली ती. परंतु, सुरक्षेबाबत काहीच तडजोड केली जाणार नाही. ''
शोध मोहीम सुरूच
पठाणकोट हल्ल्यानंतर गुन्हेगारांवर कारवाईसाठी भारताने पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी सोमवारी रात्री पाकिस्तानला पुरावे सादर केले आहेत. त्यात हवाई तळात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या पाकिस्तानातील म्होरक्यासोबत केलेल्या बातचीतचे रेकॉर्डिंग्स आहे. दरम्‍यान, आज चौथ्‍या दिवशीही शोध मोहीम सुरू असून, मंगळवारी पुन्‍हा बॉम्‍ब स्‍फोट झाल्‍याचे वृत्‍त आहे.

आणखी काय पुरावे दिले डोभाळ यांनी
- एनएसए डोभाल पाकिस्तानचे एनएसए नसीर खान जंजुआ यांच्या सतत संपर्कात आहेत.
- त्यांनी हवाई तळावरील हल्ल्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मंहम्मदचा हात असल्याचे, दहशतवाद्यांचे कॉल रेकॉर्ड्स, ज्या क्रमांकावर त्यांनी फोन केले ते पाकिस्तानी क्रमांक आणि दहशतवादी सीमापार करुन आल्याचे पुरावे सादर केले आहेत.
- याबाबत पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही.
- पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आम्ही दहशतवादाचा खात्मा करण्यास कटिबद्ध आहोत. भारत सरकारच्या संपर्कात आहोत. त्यांच्याकडून मिळालेल्या लिड्सवर काम सुरु आहे.
भारताने कारवाईसाठी दिले 72 तासांचे अल्टिमेटम
- एनएसआय डोभाल यांनी हे पुरावे गोळा केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत सरकारने पाकिस्तानला जैश वर कारवाईसाठी 72 तासांचे अल्टिमेटम दिले आहे.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. ते म्हणाले, पाकिस्तान जर दहशतवाद्यांना आश्रय देऊन आमच्या देशात अशा कारवाया करणार असेल तर आम्ही सडेतोड उत्तर देऊ शकतो.
- गडकरी म्हणाले, आम्ही मैत्रीचा हात पुढे केला याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहोत.

पाकिस्तानने कारवाई केली नाही तर, काय करणार भारत
- पाकिस्तान आणि भारतादरम्यान 15 जानेवारी रोजी परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चा होणार आहे.
- अशी माहिती आहे, की पाकिस्तानने कारवाई केली नाही तर भारत चर्चा टाळू शकतो.
- जर परराष्ट्र सचिव स्तरीय चर्चा रद्द झाली तर दोन्ही देशाचे एनएसएं भेटतील.
पंजाब उद्धवस्त करण्याच्या तयारीने आले होते दहशतवादी? सापडले 26 किलो RDX