आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Pathankot Attack, More Laser Walls Along Indo Pak Border

अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारत-पाक सीमेवर लेझर भिंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/बीकानेर - अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर ४० पेक्षा जास्त संवेदनशील ठिकाणी लेझर भिंती उभारल्या जातील. ४० संवेदनशील ठिकाणांपैकी सध्या फक्त पाच-सहा ठिकाणीच लेसर भिंती उभारल्या जाणार आहेत.
त्यामुळे घुसखोरी रोखली जाईल. त्यापैकी बहुतांश भाग नदी-नाल्यांचा आहे. अतिरेक्यांनी तेथूनच घुसखोरी करून गुरदासपूर आणि त्यानंतर पठाणकोट हवाई तळावर हल्ला केला होता.गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांच्या घुसखोरीचा धोका पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या दृष्टीने पंजाबमधील नदीपट्ट्याच्या भागात बीएसएफतर्फे विकसित लेझर वॉल तंत्रज्ञान तैनात केले जाईल. पठाणकोट हल्ल्यानंतर दहशतवादी बामियालमध्ये ऊज नदी ओलांडून आले होते. तेथील कॅमेरा खराब होता. फुटेज रेकॉर्ड होऊ शकले नाही. त्याच बरोबर जुलै २०१५ मध्ये गुरुदासपूरमध्ये हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी ताश सीमा चौकीजवळून घुसखोरी केली होती. वर्षभराच्या फरकाने घडलेल्या घुसखोरीच्या दोन घटनांमुळे सावध होत सरकारने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.
अशी असते लेझर वॉल
लेझर वॉल तंत्रज्ञानातून लेझर स्रोत आणि डिटेक्टरदरम्यान 'लाइन ऑफ साइट'मधून जाणाऱ्या वस्तू दिसू शकतात. लेझर बीमचे उल्लंघन केल्यावर मोठ्या आवाजात सायरन वाजतो. भारतात बीएसएफने त्यांसंदर्भातील स्वतंत्र तंत्रज्ञान प्राप्त केले आहे. ही संकल्पा व्हिडीओ गेम्सवरून घेण्यात आली आहे. तेथे लेझर वॉलचा वापर शत्रूंवर हल्ला करण्यासाठी केला जातो.
इस्त्रायलमध्ये प्रयोग
- इस्त्रायलमध्ये २००४पासून लेझर वॉल सुरक्षा प्रणाली कार्यरत आहे. एलबिट सिस्टम नामक कंपनीने ही प्रणाली तयार केली आहे. त्यांनी पॅलेस्टाइनला लागून असलेल्या सीमेवर लेझर वॉल तयार केली. त्यासोबतच हजारो किलोमीटर लांबीच्या िवभाजनाची रेषाही तयार केली आहे.
- अमेरिकेत होमलँड सुरक्षा विभागाने मेक्सिकोमधून होणारी घुसखोरी रोखण्यसाठी टॉवरवर आधारित लेझर बीम वॉल अन्य सुरक्षा प्रणाली तयार करण्याचे काम याच कंपनीला दिले आहे.

बिकानेरमध्ये तीन संशयित अटकेत; शस्त्रे जप्त
तसेच बिकानेमध्ये सीमेवर ऑपरेशन सर्द हवा सुरू असून त्याअंतर्गत सीमा सुरक्षा दलाने तीन व्यक्तींना संशयितरित्या फिरताना अटक केली. त्यांच्याकडे बंदूका दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.