आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Poll Defeat Sonia Gandhi Comes On Front, Makes Congress Revival Plan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पराभवानंतर काँग्रेसचा नवा प्लॅन, जाणून घ्या पक्षातील दोन बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन पक्षाला नव्या ताकदीने उभे करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटी-गाठीत वाढ केली आहे. यातून पुढचा मार्ग ठरवला जात आहे. काही काँग्रेस नेत्यांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
सोनिया गांधी सक्रिय
पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेसला पुन्हा कसे उभे करता येईल यावर सखोल चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी मॅरेथॉन बैठका घेत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांच्या घराबाहेर त्यांना भेटायला येणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आठवड्यात मंगळवारी अंबिका सोनी, विलास मुत्तेमवार, राज बब्बर, श्रृति चौधरी या सारख्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या निवडणुकीत या सर्व नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. याशिवाय राज्य पातळीवरीलही काही नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि चर्चा केली. त्यात राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, महाराष्ट्रातील उद्योगमंत्री नारायण राणे, नवनियुक्त राज्यमंत्री अमित देशमुख यांचाही समावेश होता. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास असलेल्या एका नेत्याने सांगितले, त्यांची रोजची सकाळ ही नेत्यांचा गाठी-भेटीसाठीतच जात आहे.
सोनिया म्हणाल्या, पराभवातून शिकावे लागले
सोनिया गांधी यांनी पराभूत झालेल्या नेत्यांना त्यातून धडा घेण्यास सांगितले आहे. काँग्रेसच्या तिकीटावर लढलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्यांनी पत्र पाठवल्याचे सांगितले जात आहे. त्यात त्यांनी, पराभवामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही किंवा त्यामुळे नाराज होऊ नका असे सांगितले आहे. यातून धडा घेऊन पक्षाला पुढे नेण्यासाठी आणि आणखी मजबूत करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा असा सल्ला दिला आहे.
सोनिया गांधी यांची नुकतीच भेट घेतलेल्या एका काँग्रेस नेत्याने सांगितले, 'स्थानिक, विभागीय आणि राज्य पातळीसह केंद्रीय स्तरावरही आत्मविश्लेषणाची गरज आहे. या परिस्थितीला तोंड देताना आगामी रणनीती काय असली पाहिजे याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक बोलावली पाहिजे. पराभवाच्या मानसिकतेतून कार्यकर्ते आणि नेत्यांना बाहेर काढण्यासाठी काही तरी केले पाहिजे. मात्र, अशा बैठकातून केवळ चर्चा आणि प्रतिक्रियाच बाहेर यायला नको तर काही ठोस कार्यक्रम दिला गेला पाहिजे.'

पुढाल स्लाइडमध्ये, पक्षात कोणते दोन महत्त्वाचे बदल