आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Punishing Of Corrupted Buraucrates Post Return To Them

शिक्षेनंतर भ्रष्टाचारी ‘बाबूं’चा हुद्दा परत मिळणार,वादग्रस्त अधिसूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अपहार, गैरव्यवहार, अनियमितता अशा कारणांमुळे पदावनती व वेतनकपातीसारखी शिक्षा झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍याने शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यावर त्याला त्याचे पद, हुद्दा, वेतनमान आणि सेवाज्येष्ठता पुन्हा बहाल केली जाईल.
कार्मिक-प्रशिक्षणच्या अधिसूचनेनुसार शिक्षेचा कालावधी, पदावनती आदींबाबत विभागांनी ठरवण्याचे सुचवले आहे. कारवाईनंतर अधिकार्‍याला पूर्वीचे लाभ परत करण्यात यावेत, असे यात म्हटले आहे.
खातेनिहाय शिस्तपालन प्राधिकरण, कायदा व सुव्यवस्था यंत्रणा, लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा, केंद्रीय सतर्कता आयोग, केंद्रीय माहिती आयोगाने कर्मचार्‍यांवर कारवाईची शिफारस केली होती.