आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Republic Day Ad Now Secular And Socialist Missing From Rajya Sabha Calendar

कारनामा: आता राज्यसभा कॅलेंडरमधून \'सेक्युलर\' व \'सोशलिस्ट\' शब्द गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या गेलेल्या जाहीरातीत राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून सेक्युलर व सोशलिस्ट हे शब्द हटविल्याचे प्रकरण थांबले नाही तोच राज्यसभेतील कॅलेंडरमधूनही हे दोन्ही शब्द गायब केल्याचे आढळून आले आहे.
 
मेल टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारकडून यंदा नव्या वर्षाचे राज्यसभेतील जे कॅलेंडर प्रकाशित केले गेले आहे त्यात छापण्यात आलेल्या प्रस्तावनेमधून सेक्युलर व सोशलिस्ट यासारखे शब्द गायब आहेत. सरकारी प्रस्तावनेमधून हे दोन्ही शब्द हटविल्याने काँग्रेसने जोरदार आक्षेप घेत सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे. सरकारने पुन्हा तेच स्पष्टीकरण देत देश स्वातंत्र झाल्यानंतर जी प्रस्तावना सादर करण्यात आली होती तेव्हा हे दोन शब्द त्यात नव्हते अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
राज्यसभेचे स्पष्टीकरण, चुकीचे काही केले नाही
 
राज्यसभेकडून छापण्यात आलेल्या कॅलेंडरच्या प्रस्तावनेचा त्यांनी बचाव केला आहे. राज्यसभेच्या सचिवांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ही काही चूक असू शकत नाही. उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचे ओएसडी गुरदीप सापाल यांनी म्हटले आहे की, कॅलेंडर इतिहासाचा एक भाग आहे. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की राज्यघटनेची प्रस्तावना ही ऐतिहासिक आहे व सुरुवातीच्या प्रस्तावनेत हे दोन शब्द नव्हते. 1950 मधील संविधानात हे शब्द नव्हते. हे शब्द 1976मध्ये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी 42 व्या घटनादुरुस्तीत हे शब्द टाकले होते. नियमानुसार सर्व सरकारी मूळ प्रस्तावनाच सादर करीत आले आहेत. यात काहीही चुकीचे नाही. मात्र मूळ घटनेत तुम्ही बदल करू शकत नाही.
 
भाजपचा काँग्रेसवरच निशाना- दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे की, या मूळ प्रस्तावनेबाबत आक्षेप नोंदविणा-या काँग्रेस नेत्यांनी सर्वप्रथम हे स्पष्ट करावे की देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या काळात ही राज्यघटना तयार झाली. नेहरूंनी हे शब्द टाकले नव्हते मग नेहरू सेक्युलर नव्हते का हे काँग्रेसने सांगावे. एवढेच नव्हे देशासाठी लढलेले सर्व नेते सेक्युलर नव्हते ज्यांनी राज्यघटना तयार करण्यास मदत केली. त्या नेत्यांनी हे शब्द वगळण्यामागे त्यांचा काही हेतू होता का? काँग्रेसने या प्रश्नांची उत्तरे जरूर द्यावीत मग आम्ही चुकलो असे मानू. हे दोन शब्द 1976 मध्ये मूळ प्रस्तावनेत वाढविण्यात आले याचा अर्थ त्यापूर्वी देश सेक्युलर नव्हता?. ज्या वेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या त्या काळात देश सेक्युलर नव्हता का याचे उत्तर द्यावे असे सांगत भाजपने काँग्रेसलाच सवाल विचारला आहे.
 
शिवसेनेने हे दोन शब्द वगळण्याची केली मागणी- एनडीए सरकारमधील सहयोगी पक्ष शिवसेनेने मागणी केली आहे की, राज्यघटनेच्या मूळ प्रस्तावनेत सेक्युलर व सोशालिस्ट हे दोन शब्द नव्हते. त्यामुळे हे दोन शब्द काढून टाकले. हे शब्द बळजबरीने टाकले आहेत कारण भारत हा पहिल्यापासून हिंदुराष्ट्र राहिले आहे.
 
पुढे वाचा, प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या जाहीरातीतूनही सेक्युलर व सोशालिस्ट शब्द होते गायब...