आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा वर्षांनी सोनिया काशीत : रोड शोत आजारी, तातडीने दिल्लीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी वाराणसीत रोड शोमध्ये सोनिया गांधी. याच रोड शोमध्ये त्या आजारी पडल्याने तातडीने दिल्लीला नेले. - Divya Marathi
मंगळवारी वाराणसीत रोड शोमध्ये सोनिया गांधी. याच रोड शोमध्ये त्या आजारी पडल्याने तातडीने दिल्लीला नेले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना रोड शो अर्ध्यावरच सोडावा लागला. ६९ वर्षीय सोनिया उकाडा डिहायड्रेशनमुळे आजारी पडल्या. तत्पूर्वी त्यांनी अनेकदा गाड्या बदलल्या. सुरक्षेमुळे असे केल्याचे सांगण्यात आले. मात्र सायंकाळी पावणेसातला त्यांना रोड शोमधून विमानतळावर आणले. त्यांना प्रचंड ताप होता. रक्तदाबही वाढला होता. तेथे त्यांना वैद्यकीय सुविधा दिली.

याच दरम्यान, सोनियांना दिल्लीला नेण्यासाठी चार्टर विमान वाराणसीला पोहोचलेे. त्याचीच एअर अॅम्ब्युलन्स करून रात्री साडेअकरा वाजता त्यांना दिल्लीत आणले. विमानतळावरून रात्री १२ वाजता लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात दाखल केले. १२ वर्षांनंतर सोनियांचा वाराणसीत रोड शो होता. त्याचे नाव होते ‘दर्द-ए- बनारस’. तत्पूर्वी त्यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रोड शो सुरू केला होता. त्यांना यूपीतील ब्राह्मण नेतृत्वाचे प्रतीक कमलापती त्रिपाठी चौकात भाषण द्यायचे होते. त्यानंतर काशी-विश्वनाथाचे दर्शन करायचे होते. मात्र त्याआधीच त्या आजारी पडल्या.
मोदींनी ट्विट करून लवकर बरे होण्यासाठी व्यक्त केल्या सदिच्छा
प्रियंकांनी विमानतळावर, राहुलनी रुग्णालयात सांभाळली आघाडी
>सोनिया दिल्लीत पोहोचण्याआधीच प्रियंका वाड्रा आईसाठी विमानतळावर पोहोचल्या. तर राहुलनी रुग्णालयात आघाडी सांभाळली.
>त्याआधीच एसपीजी पथक एम्स गंगाराम रुग्णालयात पोहोचले होते. शिष्टाचारानुसार सोनियांना एम्सला न्यायचे होते. परंतु गांधी कुटुंबाचे बहुतांश डॉक्टर ‘गंगाराम’चे आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी व्यवस्था होती.मात्र त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल केले गेले.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत सोनियांनी वाराणसीतूनच केली होती रोड शोची सुरुवात

सोनियांनी२००४ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीसह पूर्व उत्तर प्रदेशात यशस्वी रोड शो केले होते. त्यावरच काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएची सत्ता आली होती.मंगळवारच्या रोड शोत तोच जोश होता.
बातम्या आणखी आहेत...