आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Spending 7 Crores Rupee , Prime Minister Resident In Denger Zone

नूतनीकरणावर सात कोटी खर्च करूनही धोकादायक इमारतींत पंतप्रधानांचाही बंगला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नूतनीकरणावर सात कोटी रुपये खर्च करूनही पंतप्रधानांचे 7, रेसकोर्स रोडवरील शासकीय निवासस्थान सुरक्षित नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने (सीपीडब्ल्यूडी) हा बंगला 500 धोकादायक इमारतींच्या यादीत टाकला आहे. व्हीआयपींच्या बंगल्यांच्या डागडुजीवर 3 हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे.

संसदेच्या नगरविकासावरील स्थायी समितीच्या अहवालात सीपीडब्ल्यूडीने म्हटले की, ल्युटियन्स झोनमधील बंगले भूकंपासारख्या आपत्तीत सुरक्षित नाहीत. 1920 ते 1930 या काळातील हे बंगले आहेत. ब्रिटिश अधिकार्‍यांसाठी ते बांधण्यात आले होते. त्यांची मुदत 30 वर्षांची होती आणि आता त्यांना 90 वर्षे झाली आहेत, असे सीपीडब्ल्यूडीच्या एका इंजिनिअरने सांगितले.


अहवालात काय
0पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांचे बंगले असुरक्षित आहेत.
0ल्युटियन्स झोन 2,200 हेक्टरवर असून प्रत्येक बंगला 23 एकरांवर आहे.
0बंगल्यांची डागडुजी करण्याऐवजी नव्याने बांधणेच चांगले ठरेल.
0बंगल्यांच्या जागी दुमजली इमारत उभारावी, परंतु व्हीआयपींची तयारी नाही.