आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइक दरम्यान उद्धवस्त दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उरी लष्करी तळावरील हल्ल्यानंतर सीमारेषेपलिकडे जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले होते. ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. याशिवाय पीओके जवळ साधारण 15 दहशतवादी कँप सक्रिय झाले आहे. या तळांवर प्रशिक्षित दहशतवादी पाठवले जात आहेत. सोमवारी पुंछ येथे बीएटीने केलेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. नंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती.
 
 लष्कराचा आहे नवा प्लॅन 
 - पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बीएटी) गेल्या काही महिन्यात चारवेळा जोरदार हल्ल्यांचा अयशस्वी प्रयत्न केला. आता भारतीय लष्कर बीएटीला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे. 
 - एएनआय वृत्तसंस्थेने इंटेलिजन्स सूत्रांच्या हवाल्याने सांगितले, की पाकिस्तानात 15 दहशतवादी ट्रेनिंग कँप सुरु झाले आहे. त्यातील 10 पीओके आणि 5 पाकिस्तानमध्ये आहे. पीओकेमधील 10 कँप हे एलओसीपासून अवघ्या 20-25 किलोमीटर अंतरावर आहेत. 
 
हे पण वाचा... 
बातम्या आणखी आहेत...