आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमुने तपासणीत अडकलेली मॅगी आता बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नमुने तपासणीत अडकलेली मॅगी आता बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, तत्पूर्वी देशातील तीन प्रमुख प्रयोगशाळांत मॅगी तपासली जाईल. अहवाल योग्य असेल तरच बाजारात येईल. शिशाचे प्रमाण अधिक आढळल्याने सुरू झालेला मॅगीविरुद्धचा वाद मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम नमुने जयपूर, हैदराबाद व मोहाली या तीन प्रमुख प्रयोगशाळांत पाठवण्याचा आदेश दिल्यानंतर थांबण्याची शक्यता निर्माण झाली होती. मॅगीच्या सहा प्रकारच्या ९० नमुन्यांत शिशाचे प्रमाण योग्य असल्याचे आढळले होते.