आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After The NDA Split In Bihar, The Minority Report Card

नितीशकुमारांच्या \'सुशासन\'वर प्रश्नचिन्ह, जातीय दंगलींचे प्रमाण तीनपटीने वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बिहारमध्ये नितीशकुमार यांचे सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. गेल्या वर्षी जून ते डिसेंबर दरम्यान बिहारमध्ये लहान-मोठ्या जातीय दंगली झाल्या. दंगलींची संख्या जून २०१२ ते डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या दंगलींपेक्षा तीनपट अधिक आहे.

'इंडियन एक्सप्रेस' वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार दंगलींच्या संख्येमध्ये ही वाढ तेव्हा झाली जेव्हा एनडीएमधून भाजप आणि जेडीयू वेगवेगळे झाले. २ जून २०१३ मध्ये हे दोन पक्ष वेगळे झाले. दोन्ही पक्ष साडेसात वर्ष एकत्रितपणे काम करत होते. यादरम्यान एकही जातीय दंगल झाली नाही.

परंतु, जेडीयू सरकार या दंगली स्थानिक स्तरावरच्या आहेत असे सांगून, याकडे दुर्लक्ष करत आहे. बिहार सरकारमधील मंत्री शाहिद अली खान यांनी सांगितले, की 'छोट्यातील-छोट्या जातीय दंगलींची माहिती देण्याचे काम गुप्तचर यंत्रणेचे आहे. यामधील अनेक घटना स्थानिक स्तरवरच्या असून तेथील अडचणी लवकरच दूर करण्यात आल्या आहेत.'