आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमेझॉनने पुन्हा केला भारताचा अपमान, तिरंग्याच्या पायपूसनंतर आता चपलेवर महात्मा गांधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अॅमेझॉन ई कॉमर्स कंपनीने पुन्हा एकदा भारताचा अपमान केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच कॅनडाच्या अॅमेझॉनने तिरंग्याच्या रंगातील पायपूस ऑनलाइन विक्रीसाटी उपलब्ध केले होते. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी खडसावल्यानंतर या प्रोडक्टची जाहिरात वेबसाईटवरून काढण्यात आली. मात्र आता अमेरिकेतील अॅमेझॉन डॉट कॉम या वेबसाइटने महात्मा गांधीजींचे चित्र असलेली चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करून पुन्हा एकदा भारताचा अपमान केला आहे. 
 
सुषमांनी दिला होता व्हिसा रद्द करण्याचा इशारा.. 
- पायपूसच्या मुद्द्यावरून परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून अॅमेझॉनला खडसावले होते. भारतीय ध्वजाची बदानामी करणाऱ्या प्रॉडक्टची विक्री बंद केली नाही तर अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना भारताचा व्हिसा देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. 'ज्यांना आधी व्हिसा देण्यात आला असेल त्यांचाही व्हिसा रद्द केला जाईल' असेही ट्वीटरवर म्हटले होते.  
सोशल मीडिया यूझर्सने सुषमा स्वराजांकडे केली तक्रार
- काही भारतीय सोशल मीडिया यूजर्सने सुषमा स्वराज आणि कॅनडातील भारतीय दुतावास, परराष्ट्र मंत्रालयाला ट्विट करुन प्रॉडक्ट बद्दलची माहिती दिली होती. 
- लोकांनी या प्रॉडक्टच्या जाहिरातीवर लिहिले होते, 'अॅमेझॉनने तिरंग्याचा अपमान केला आहे. हे आमच्या सन्मानाच्याविरोधात आहे. या प्रॉडक्टला त्वरीत हटवले गेले पाहिजे.'
- 'पायपुसणीच्या माध्यमातून तिरंगा आणि देशाचा अपमान होत आहे. त्याची विक्री तत्काळ थांबवावी.'
 
दुसऱ्या देशांचा झेंडा असलेल्या प्रॉडक्ट्सची विक्री
- अॅमेझॉन कॅनडावर इतरही देशांच्या ध्वजांच्या पायपुसण्या विक्रीसाठी आहेत. त्यात अमेरिका आणि कॅनडा यांचा समावेश आहे. 
- अमेरिका आणि कॅनडाचे नागरिक त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाचे टॉवेल, बेडशीट आणि इतर अनेक प्रॉडक्ट्स वापरतात.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, तिरंग्याच्या रंगातील पायपूसची जाहिरात आणि सुषमा स्वराज यांनी केलेले ट्वीट्स...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)