नवी दिल्ली - विविध पेचप्रसंगांना सामोर्या जात असलेल्या आम आदमी पार्टीसमोर आता वेगळीच समस्या उभी राहिली आहे. समर्थकांमध्ये विविध कारणांनी अस्थिरता आहे. पक्षाचा लोगो डिझाइन करणार्या सुनील लाल यांनी संयोजक अरविंद
केजरीवाल यांच्याकडे लोगो परत देण्याची मागणी केली आहे.
मी तयार केलेल्या लोगोचा वापर त्वरित बंद करा, अशी मागणी पत्राद्वारे सुनील लाल याने केली आहे. कडी म्हणजे त्याने
केजरीवालांना प्रश्न केलाय, देशासमोर कोणती मजबुरी आहे? एका सणकी माणसाचे कोणी का ऐकावे? सुनील यांनी १३ जुलै २०१३ रोजी केजरीवालांना लोगो डिझाइन करून दिला होता. मात्र, त्याचे बौद्धिक संपदा अधिकार
आपण पक्षाला दिले नव्हते, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. लोगो डिझाइन करताना माझ्या मनात सद्भावना होत्या.
मात्र, याखाली विविध प्रवक्ते भ्रष्ट राजकारण करत असून ते बघवत नसल्याचे लाल यांनी पत्रात लिहिले आहे. महात्मा गांधींच्या स्वराज्याची कल्पना घेऊन आपने मते मिळवली; पण लोकांची जास्त काळ फसवणूक करता येत नाही. लोकशाहीविरोधी पार्टीरचनेतून राज्य मिळाले, तरी त्याचा काय उपयोग, असा सवाल त्याने पत्रात विचारला आहे.
फेसबुकद्वारे केली टीका
पार्टी कार्यकर्त्यांनो, सत्ताप्राप्तीसाठी तुमचा वापर झालाय. आता काही बोलाल तर खबरदार. तुमच्याच पैशांतून उभारलेल्या ‘आप’ ब्रँडच्या गुंडाकडून तुमची सोय लावली जाणार आहे. तुमच्यासारख्या मंदबुद्धी आपच्या अंध भक्तांनी उभारलेल्या निधीचा सदुपयोग होत आहे. आता तुमची दया वाटत आहे.