आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालकृष्ण अडवाणींनी घेतली मोहन भागवतांची भेट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आजारी असताना त्यांनी आज, गुरुवारी सकाळी संघाच्या मुख्यालयात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

अडवाणी आजारी असल्याने यांची बुधवारी भेट होऊ शकली नव्हती. यामुळे ते भेटायला आले तर भेटू,अशी भागवत यांनी तटस्थ भूमिका घेतली होती.

दरम्यान, गंगा नदीच्या मुद्द्यावर होणा-या पक्षाच्या उपाध्यक्ष उमा भारती यांच्या कार्यक्रमालाही ते हजर राहू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकारिणीच्या गोव्यातील बैठकीलाही आजारी असल्यामुळे ते हजर नव्हते. त्यावरून उलटसुलट चर्चाही झडली होती. निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदाची धुरा मोदी यांच्याकडे देण्यात आल्याने ते नाराज असल्याचे त्या वेळी बोलले जात होते. बैठकीनंतर अडवाणी यांनी राजीनामाही दिला होता. तथापि, भागवत यांच्या सांगण्यावरून त्यांनी नंतर तो मागेही घेतला.या घडामोडींनंतर प्रथमच भागवत यांच्याशी त्यांची भेट झाली. भाजपाध्यक्ष राजनाथसिंह आणि अन्य नेतेही सरसंघचालकांना भेटण्याची शक्यता आहे.