आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agility, Handling Office Politics Most Important For Career Success

ऑफिस पॉलिटिक्स हाताळणारे यशस्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कार्यालयात वावरताना चापल्य असावे लागते. त्याचबरोबर ऑफिस पॉलिटिक्स हाताळण्याचे कौशल्यही असले पाहिजे. यशस्वी करिअरसाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.

हेडहोंचोस डॉट कॉमच्या वतीने मे-जून 2014 मध्ये करण्यात आलेल्या पाहणीतून ही माहिती पुढे आली आहे. जॉब सर्चमधील आघाडीच्या पोर्टलने व्यवस्थापन आणि वरिष्ठ व्यावसायिक पातळीवरील रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम या पोर्टलमार्फत करून दिले जाते. करिअर सॅव्ही व्यावसायिकांना केवळ कामाचा परफॉर्मन्स आवश्यक वाटत नाही, तर त्यांच्या दृष्टीने चपळता, बदलास सामोरे जाण्याचा स्वभाव, नव्या गोष्टींना तत्काळ प्रतिसाद देणेदेखील त्यासाठी महत्त्वाचे आहे.

करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी चपळता हा घटक महत्त्वाचा आहे. ते नसेल तर करिअरचा मार्ग घसरणीला लागू शकतो, असे 34 टक्के सहभागी व्यावसायिकांना वाटते. हे प्रमाण सर्वेक्षणातील एक तृतीयांश एवढे आहे. अहंकाराचा मुद्दाही करिअरसाठी तितकाच महत्त्वाचा ठरतो. न्यूनगंडदेखील प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकतो.